राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कु. सरस्वती पोताने हिचे यश
प्रतिष्ठा न्यूज /जिल्हा प्रतिनिधी
नांदेड दि.13 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या द्वारे आयोजित राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कुमारी सरस्वती संजय पोताने हिने द्वितीय क्रमांक पटकावून यश मिळविले आहे.
कुमारी सरस्वती पुताने ही शंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा बोरताळ पाटी ता. उदगीर जिल्हा लातूर येथील विद्यार्थिनी आहे.
ही वेटलिफ्टिंग स्पर्धा रिसॉर्ट तालुका कुडोळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आली होती. तिने 19 वर्षाखालील मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक पटकावून सुयश संपादन केले आहे .कुमारी सरस्वती पोताने ही एका गरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनी आहे. ती ग्रामीण भागातील मोटर्गा तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील खेडेगावातील रहिवासी आहे. तिच्या या यशाबद्दल श्री रत्नाकर कोत्तापल्ले श्रीरंग कुंदटवाड, श्री प्रकाश बाणे श्री मधुकर मठपती श्री रामेश्वर आणेराये, तुकाराम रामनबैनवाड आणि उमेश कारामुंगे ,राजू पवार यांनी अभिनंदन केले आहे.