प्रतिष्ठा न्यूज

भामट्या मुकादमांवर कारवाईसाठी ऊस वाहतूकदारांची सांगलीत जोरदार रॅली

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राज्यातील ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर मालकांची आतापर्यंत सुमारे १०० कोटी हुन अधिक रुपयांवर फसवणूक झाल्याचे प्रकरणे पुढे आली आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील मोठ्या रक्कमा त्यात अडकली आहे. या प्रकरणी पोलिस, जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई सुरु करावी, या मागणीसाठी ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर मालकांनी सांगलीत आज जोरदार रॅली काढली. रॅलीचे नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार आणि संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील यांनी केले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर सकाळी १० वाजता वाहतूकदार एकत्र आले.. त्यात सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या लगतच्या जिल्ह्यांसह राज्यभरातून फसलेले लोक सहभागी झाले होते. पाच ट्रॅक्टर आणि शेकडो लोक चालत मुख्य रस्त्याने महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ आले. स्टेशन चौकात वसंतदादा पाटील स्मारकाजवळ सभ झाली.
ऊस तोडणी टोळ्या पुरवणे ही आधी कारखान्यांची जबाबदारी होती. ती त्यांनी ट्रॅक्टर मालकांच्या खांद्यावर टाकली. आता ट्रॅक्टर मालकांनी स्वतःची शेती गहाण टाकून लाखो रुपये टोळी मुकादमांना दिले असून ते पळून गेले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून त्यांना शोधून काढावे. सोबतच, अशी फसवणूक टाळण्यासाठी शासन स्तरावरती कायमस्वरुपी धोरण ठरवाले जावे , या मधे सदर केसेस fast track न्यायालयत चालावलया जावयात , फसवणुकीची केस हि दिवानी न धरतां फौजदारी गुन्हा ठरवला जावा,, शासनाने मुकादम व मजुर यांचे रजिस्टरेशन करावे , केसचे निकाल लागुन वसुली होवु पर्यंत बॅंक व वित्त संस्थानी वसुली प्रकरीया सथगीत करावी., या सह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या रॅलीत माजी आमदार नितीन शिंदे, माजी उपमहापौर शेखर इनामदार यांच्यासह नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.