प्रतिष्ठा न्यूज

न्यू इंग्लिश स्कूल बेडगच्या संकिता राजेश विटेकरचे कराटे मध्ये उल्लेखनीय यश

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य ,पुणे , क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सांगली द्वारा आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धां अंतर्गत कराटे स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल बेडगची विद्यार्थिनी संकिता राजेश विटेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास पाटील, पर्यवेक्षिका उज्वला ढेरे, क्रीडा विभाग प्रमुख श्वेता पाटील, विद्यालयाच्या विविध समित्यांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी तिचे हार्दिक अभिनंदन केले.
कराटे कोच सतीश पाटील, घोरपडे सर , अमजद मुजावर , एम.डी. जाधव शिक्षण संकुलाचे सेक्रेटरी किरण जाधव आणि क्रीडा क्षेत्रातील विविध तज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.