प्रतिष्ठा न्यूज

आगामी निवडणुका पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातील पदाधिका-यांची देगलूर येथे आज महत्वपूर्ण बैठक : माजी मुख्यमंत्री ना. चव्हाण यांचे मार्गदर्शन होणार

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड दि.18 : आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माजी देगलूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने रविवार, दि. १८ रोजी काँग्रेस आहे. पक्षाच्या एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

दि. १८ रोजी दुपारी ३.३० वाजता देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आ. जितेश अंतापूरकर यांच्या देगलूर येथील कार्यालयात होणाऱ्या या बैठकीस माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा.आ. अमरनाथ राजूरकर, आ. जितेश अंतापूरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती

माधवराव मिसाळे, जि.प.चे समाज कल्याण सभापती अॅड. रामराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती राहणार

आगामी काळात होणाऱ्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या विभागनिहाय तयारीचा आढावा या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

ही बैठक केवळ निमंत्रीतांसाठी असून या बैठकीस देगलूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माजी नगरसेवक, काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे ब्लॉक अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटीचे तालुक्यातील पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख बळेगावकर व देगलूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर कंठेवाड यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.