प्रतिष्ठा न्यूज

विसापूरला श्री दुर्गामाता महादौड शेकडो धारकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : विसापूर येथे गेली नऊ दिवस सुरु असलेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या श्री दुर्गामाता दौडीची आज शेकडो धारकऱ्यांच्या उपस्थितीत महादौडीने सांगता झाली.गावात या दुर्गामाता महादौडीचे विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.सकाळी मारुती मंदिर येथे ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र झाल्यानंतर या महादौडीस प्रारंभ झाला.भगवा ध्वज घेऊन निघालेल्या दौडीचे पुष्पवृष्टी व फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले.रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळी काढून स्वागत करून महिलांनी भगव्या ध्वजाचे पूजन करून पंचारतीने औक्षण केले.आजच्या या महादौडीत लहान मुले,तरुण,जेष्ठ धारकरी,तरुणीसह,महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय,धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय, हिंदू धर्म की जय,जय श्रीराम,भारत माता की जय,अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी प्रत्येक धारकरी डोक्यावर भगवा फेटा,पांढरी टोपी आणि कपाळी भगवा टिळा लावून सहभागी झाला होता.ग्रामपंचायत कार्यालय जवळ या दौडीची सांगता झाली.यावेळी सरपंच अशोक मोहिते,दिलीप माने, प्रशांत माने, विनायक माळी, मानसिंग माने, अभिजित माने, आदित्य चव्हाण, अतुल साळुंखे, प्रथमेश पोतदार, अमित माने, रोहित माने, जगदीश माने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.