प्रतिष्ठा न्यूज

आम आदमी पार्टी, सांगलीच्या वतीने संपर्क अभियानाला बेथेलहेम नगर येथून सुरवात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आम आदमी पार्टी,सांगलीच्या वतीने घेण्यात आलेल्या संपर्क अभियाना अंतर्गत प्रभाग क्रं-7 मधील बेथेलहेम नगर येथील रहिवाश्यांची आम आदमी पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट घेतली. तसेच त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती करून घेतली. चपाती डायग्रॅम या लोहसहभागी संसाधनाच्या व तेथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व समस्या जाणून घेणेत आल्या. जागीच ऑनलाइन सर्वेक्षण फॉर्म देखील भरण्यात आला. यामुळे स्थानिक नागरिकात कुतूहल पैदा होऊन तेथील स्थानिक मोठ्या प्रमाणात गोळा झाले.
सदर उपक्रमामध्ये पश्चिम महाराष्ट्र सचिव वासिम मुल्ला, जिल्हा समन्वयक कृष्णा आलदर, सह-समन्वयक आरिफ मुल्ला, सचिव युवराज मगदूम, संघटक फय्याज सय्यद, खजिनदार जोहेब मुल्ला, सह संघटक संतोष मगदूम, युवा आघाडी अध्यक्ष सागर भोसले, उपाध्यक्ष तौफिक हवलदार, सचिव निसार मुल्ला, मिरज शहरचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड, उपाध्यक्ष रवी बनसोडे, संघटक श्रीकांत चंदनवाले,निवृत्ती जाधव, अझहर मुतवल्ली, जहांगीर आगा व संदीप कांबळे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संभाजी मोरे, सचिव इमरान पठाण, सतीश सौंदडे, कुपवाड शहरचे राम कोकरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.