प्रतिष्ठा न्यूज

शिवसेना गुंठेवारी विकास समितीच्या ७४८ पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा शिवसेना गुंठेवारी विकास समितीची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांच्या उपस्थितीत आज पार पडली. या बैठकीत ७४८ पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
जिल्हा अध्यक्ष विजय बल्लारी, महिला अध्यक्षा मनीषाताई पाटोळे, युवक जिल्हा अध्यक्ष रविराज कुकडे, ग्रामीण अध्यक्ष मासाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकारी यांची सर्वांनी मिळून ७४८ पदाधिकारी नेमण्यात आले असून त्यांच्या नावाची यादी, मोबाईल नंबर, पत्ता, पक्षाचे नेते मा. सुभाष देसाई, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रा. नितीनजी बानुगडे सर यांचे सोपवण्यात येणार आहे. शिवसेना गुंठेवारी पदाधिकारी यांच्या बैठकीत येणाऱ्या कळात नागरिकांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी लोक अदालत आयोजित करून शिवसेना गुंठेवारी चे पदाधिकारी यांनी नियोजन करावे, व पक्षाचे अधिकृत सभासद पदाधिकारी यांनी करून घ्यावे, पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात पोचवावे अशा सूचना करण्यात आल्या.

चव्हाण म्हणाले, येणाऱ्या काळात सांगली सह राज्यात गुंठेवारी खरेदी विक्री बाबत शासनाने नवीन कलम 18 A आणले असून ते जाचक व नागरिकांना वेठीस धरणारे आहे. तेव्हा 2022 पर्यंत राज्यात लाखो लोक गुंठेवारी जागा घेण्यासाठी अग्रीमेंट करार करून वाट पाहत आहेत त्यांचा शासनाने अटी घालून मुभा देण्यासाठी तसेच तुकडे बंदी कायदा या राज्यातून हद्दपार व्हावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे शेवटी म्हटले आहे.

या बैठकीत,नईम शेख, युवराज मोने,गजानन हंकारे, शहाजी जाधव प्रतीक पाटील, सुनीता माने, शारदा गुरव, सरस्वती चौगुले, सुगंधा माळी, रुपाली सावंत आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.