प्रतिष्ठा न्यूज

मिरज येथील गुलाबराव पाटील नर्सिंग महाविद्यालयाच्या 18 व्या बॅचचा विद्यार्थ्यांचा शपथविधी समारंभ उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मिरज येथील गुलाबराव पाटील नर्सिंग महाविद्यालयाच्या 18 व्या बॅचचा विद्यार्थ्यांचा शपथविधी समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय महाविद्यालयाचे शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम तर अध्यक्ष म्हणून गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचे चेअरमन पृथ्वीराज पाटील हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना स्व. गुलाबराव पाटील साहेब यांच्या कार्याविषयी आदर व्यक्त करत डॉ. कदम म्हणाले, या नयनरम्य सोहळ्यास उपस्थित राहता आले हे मी माझे भाग्य समजतो. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी सेवेची शपथ घेतली असून प्लॉरेन्स नायटींगल यांच्या विचारांचा पाईक म्हणून काम करावे. त्यांचे आम्मचरीत्र पाहिले की. नर्सिंग क्षेत्रात किती आव्हाने आहेत याची प्रचिती येते. त्यांच्या आदर्शाचे पालन प्रत्येकाने करावे. शपथविधीतील एका एका शब्दाने तुम्हाला आत्मविश्वास आणि प्रेरणा दिली असून हीच प्रेरणा घेऊन तुम्ही तुमच्या कार्यातून गोरगरीब रुग्णांच्या आयुष्यात प्रकाश द्यावा, नर्सिंग क्षेत्र ही नोकरी किंवा व्यवसाय नसून, अखंडपणे सेवा आहे यामध्ये सेवानिवृत्ती नाही या संस्थेतून तयार होणारे विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहून गोरगरीब रुग्णांची सेवा करतील व त्यांचे क्षेत्रात यशस्वी होतील असा माझा विश्वास आहे. यशस्विता ही पैशामध्ये मोजता येत नाही. कोरोनाच्या परीस्थितीमध्ये डॉक्टरांबरोबर सर्व नर्सेस व नर्सिंग शिकत असणा-या विद्यार्थ्यांनी खुप मोलाची कामगिरी केली. त्यामुळे नर्सेसचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, सांगली जिल्हयातील एका गरीब कुटुंबातून डॉक्टर झालेल्या सुपुत्राची जिल्ह्याचे प्रमुख असलेल्या रुग्णालयाच्या सिव्हिल सर्जन पदी नियुक्ती झाली ही बाब गौरवास्पद असून आमच्या संस्थेच्या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून लाभले हे आम्ही आमचे भाग्य समजतो. नर्सिंगच्या पालकांना ते म्हणाले की तुम्ही तुमच्या पाल्याचा प्रवेश नर्सिंग GNM साठी केला, ही योग्य निवड केली असून येथे उपस्थित सर्व विद्यार्थ्याच्या चेह-यावर सेवेचा भाव दिसुन येतो. या विद्यार्थ्यांना आमच्या संस्थेतून दर्जेदार शिक्षण मिळेल अशी मी आपणास ग्वाही देतो. लॅम्प लायटींग हा विद्यार्थ्याच्या जीवनातील महत्वाचा टप्पा असून आतापर्यंत आमच्या संस्थेतून 1000 च्या वर विद्यार्थी यशस्वीपणे शिक्षण घेऊन त्यांचे क्षेत्रात कार्यरत आहेत याचा आम्हांस अभिमान आहे.

कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली. विद्यार्थ्यांना शपथ सुरज खोत यांनी दिली. तर प्रास्ताविक पी बी बी एससी चे प्राचार्य अभय गायकवाड यांनी केले. सुत्रसंचालन समिक्षा देवकुळे यांनी केले. यावेळी संस्थचे कॅम्पस कॉऑर्डीनेटर सतिश पाटील सर, नर्सिंगचे प्राचार्य विनय डोंगरे, उपप्राचार्य शैलेंद्र मालप यांचेसह डॉ. प्रताप भोसले टयुटर तृप्ती कुरणे, मोहन कोडग, स्तुती हेगडे, मुस्कान मुजावर, रोहीणी गोरे, महेंद्र कांबळे प्रफुला आवळे यांचेसह सर्व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. आभारप्रदर्शन प्रतिक्षा लोखंडे यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.