प्रतिष्ठा न्यूज

युनिक अकॅडमी मुळे विद्यार्थ्यांना अबॅकसची ओळख : अजयकाका पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव सारख्या निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना युनिक अकॅडमी मुळे अबॅकस ची ओळख झाली आहे,विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी अबॅकस महत्वाची भूमिका बजावेल असे प्रतिपादन तासगावचें नगराध्यक्ष अजय काका पाटील यांनी केले.युनिक अकॅडमी (अबॅकस) तासगाव यांच्या विदयार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला.यावेळी अजय (काका) पाटील बोलत होते,विष्णू मंदिरच्या सभागृहात झालेल्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका शारदा पाटील समर्थ अकॅडमीचे संचालक संकपाळ सर युनिक अकॅडमीच्या सुप्रिया पवार व स्नेहल जाधव  या कार्यक्रमास उपस्थितीत होत्या.कार्यक्रमाच्या स्वागत व प्रास्ताविकात बोलताना सुप्रिया पवार यांनी अबॅकस बद्दलची माहिती सांगितली त्या म्हणाल्या अबॅकस म्हणजे थोडक्यात दोन्ही मेंदूचा विकास होणे गणितीक्रिया काही सेंकदामध्ये करणे आणि या अकॅडमीच्या विदयार्थ्यांनी 4 ते 5 मिनिटामध्ये १०० गणिते सोडवली आहेत.या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कौस्तुभ औताडे 4.35, मार्क,100/ कस्तुरी औताडे, 4.38/100, रुद्र लुगडे 5.35/100 तन्मयराजे माळी 4.40/100, सार्थक मोहिते, 5.10/100 सुदीप्ती खराडे ,4.30/100 हर्षद आडसूळ, हर्षवर्धन पाटील,श्रीवर्धन गायकवाड,अविराज जोतराव,आदिती माळी,अनुष्का माळी इत्यादी विदयार्थ्यांनी पहिल्या तीन नंबर पटकावले आहेत.प्रत्येक लेव्हलच्या विदयाथ्यांनी अतिशय उत्कृष्ट मार्क संपादन केले आहेत त्याचबंशेवर शारदा पाटील मॅडम यांनी मुलांना वाढता मोबाईल – चा वापर कसा कमी करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.त्यानंतर आदणीय संकपाळ सर यांनी मुलांना स्पर्धेची माहिती १०/१२ वी मध्ये न देता आता पासून त्याची तयारी कशी घेतली जाते याचे मार्गदर्शन केले व पुढील वाटचाली साठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.यावेळी विशेष प्रवीण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.