प्रतिष्ठा न्यूज

पंढरपूर सिंहगडच्या विद्याराणी क्षीरसागर हिची “टेक महिंद्रा” व “टीसीएस” या दोन कंपनीत निवड

प्रतिष्ठा न्यूज / प्रमोद बनसोडे
पंढरपूर : कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली नारायण चिंचोली (ता.पंढरपूर) येथील कुमारी विद्याराणी अशोक क्षीरसागर हिची “टेक महिंद्रा” व “टीसीएस” या दोन आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीत कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
“टेक महिंद्रा” प्रा. लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे. जी माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय प्रक्रिया आउटसोर्सिंग सेवा प्रदान करते. तर “टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” हि कंपनी उद्योग समूहातील सर्वाधिक बाजार मुल्यांकन असलेली व्यापारी संस्था आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात ११६,३०८ कर्मचारी, ४७ देशातील कार्यालये आणि ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर वार्षिक उत्पन्न असलेली “टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” (टी.सी.एस.) कंपनी आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी व्यापारी संस्था म्हणून “टीसीएस” या कंपनीचा उल्लेख केला जातो. अशा या आंतरराष्ट्रीय दोन नामांकित कंपनीत काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेल्या कुमारी विद्याराणी अशोक क्षीरसागर हिची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन तिला टीसीएस कंपनीकडून ३.३७ लाख वार्षिक पॅकेज तर टेक महिंद्र कंपनीकडून ३.२५ लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण देण्यासाठी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज सोलापूर जिल्ह्यात अग्रस्थानी आहे. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम उत्कृष्ट शिक्षणप्रणाली, उच्च शिक्षित व शिस्त प्रिय अनुभवी प्राध्यापक, जगातील नामवंत कंपनीत विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या नोकऱ्या, पंढरपुर सिंहगडचे विद्यापीठात सर्वोत्कृष्ट निकाल, सामाजिक बांधिलकी याशिवाय नुकताच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजला “उत्कृष्ट महाविद्यालय” पुरस्कार मिळाला आहे. उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळविणारे जिल्ह्यातील एकमेव इंजिनिअरींग काॅलेज आहे. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा यासाठी महाविद्यालय नेहमीच विविध उपक्रम राबवत असते या सर्व गोष्टीमुळे पंढरपुर सिंहगडला इंजिनिअरींग काॅलेजला नॅशनल अँक्रिडिटेशन अँण्ड असेसमेटं कौन्सिल म्हणजे नॅक समिती कडून “ए” ग्रेड मिळाला आहे. भविष्यात जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांना नामंकित व बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रत्नशील असल्याचे मत ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी सांगितले.
कुमारी विद्याराणी अशोक क्षीरसागर हिची “टेक महिंद्रा” व ” टीसीएस” प्रा. लिमिटेड या दोन कंपनीत निवड झाल्याबद्दल काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. संदीप लिंगे, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.