प्रतिष्ठा न्यूज

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजभाऊ आखरे यांचा नांदेड दौरा : कार्यकर्त्यांना हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ थोर विचारवंत / इतिहासाचे गाढे अभ्यासक / संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष मा. मनोजभाऊ आखरे यांचा नियोजित नांदेड दौरा दिनांक 7 आक्टोंबर 2022 रोज शुक्रवारी सकाळी 11 वाजता देगाव (कु) ता. अर्धापुर येथे व्यायाम शाळेचे उदघाटन होणार आहे.
– संपर्क :- भगवान कदम (जिल्हाध्यक्ष नांदेड)
तर दुपारी 1 वाजता कलंबर ता. लोहा येथे लोहा तालुक्याच्या वतीने सत्कार सोहळा – संपर्क:- ज्ञानेश्वर शिंदे (तालुकाध्यक्ष लोहा) बंटी शिंदे (विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष लोहा)
दुपारी 2 वाजता कंधार येथील शासकीय विश्रामगृहात लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी हितगुज व सत्कार सोहळा- संपर्क:- नितीन कोकाटे (तालुकाध्यक्ष कंधार)
विकास लुगारे (शहराध्यक्ष कंधार)
दुपारी ३.०० वाजता मुखेड शहरात संभाजी ब्रिगेड नामफलकाचे उदघाटन मुखेड तालुक्यातील चांडोळा, धनज, पाळा, तुपदाळ, जाहुर, भाटापुर, अंबुलगा, गोजेगाव, हसनाळ (प.मु) येथील शाखेचे उदघाटन व हसनाळ (प.मु.) येथे जाहीर सभा- संपर्क :- प्रदीप इंगोले (तालुकाध्यक्ष मुखेड) मनोज बनबरे (विधानसभा अध्यक्ष) सदानंद पाटील (शहराध्यक्ष नांदेड) व मुक्काम राहतील.
दिनांक 8 आक्टोंबर 2022 रोज शनिवारी
सकाळी 9 वाजता नांदेडहून हदगाव कडे प्रयाण
सकाळी 10 वाजता हदगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकत्यांची बैठक- संपर्क:- किरण वानखेडे (तालुकाध्यक्ष हदगाव), सारंग मिराशे (तालुकाध्यक्ष हिमायतनगर )
तर दुपारी 3 वाजता माहुर शासकीय विश्रामगृह येथे किनवट – माहूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकत्यांची बैठक-
संपर्क :- विशाल शिंदे (तालुकाध्यक्ष माहूर) सचिन कदम (तालुकाध्यक्ष किनवट) व नंतर उमरखेड कडे रवाना होतील.
तरी सर्व कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे ब्रिगेड नांदेड.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.