प्रतिष्ठा न्यूज

द्राक्ष उत्पादकांना यंदा अच्छे दिन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : दोन वर्षांच्या कोरोना काळात झोपलेला द्राक्ष हंगाम या वर्षी मात्र उच्चांकी दराने जोरात होणार असं बोललं जात आहे.
कोरोना काळात बंद असलेल्या सर्वच मोठ्या बाजारपेठा जोमाने सुरु झाल्या आहेत.दोन वर्षाच्या कोरोना काळात संपूर्ण भारतात आणि जगभरात  द्राक्षांची मागणी घटली होती.यावर्षी मात्र द्राक्षांना सोन्याचे दिवस येतील अशी परस्थिती आहे.यावर्षी द्राक्ष शेतीला चांगले वातावरण आहे, त्यामुळे उत्तम प्रतीची आणि चांगल्या क्वालिटीची द्राक्ष मार्केटला येणार आहेत.त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना चांगलाच दर मिळणार असल्याचे बोलले जात आहे.जागतिक बाजारपेठेसह देशाच्या विविध राज्यांत द्राक्षांची निर्यात यंदाच्या हंगामात सुरळीत सुरू असल्याने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी कोरोनाच्या अफवांवर विश्वास न ठेवता,यंदाच्या हंगामात निर्भयपणे द्राक्षांची खरेदी,विक्री करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.जील्ह्यातील द्राक्ष देशभर व विदेशातसुद्धा निर्यात होत असल्याने येथील द्राक्ष बाजारपेठेत येण्याची उत्सुकता ग्राहकांना कायमच असते.निसर्गाच्या विविध संकटांचा सामना करत द्राक्ष उत्पादकांनी जीवाचे रान करत यशस्वीपणे द्राक्षाबागा सांभाळल्या आहेत.मागील काही महिन्यांपासून द्राक्ष उत्पादकांसमोर गारपीट,अतिवृष्टी व कडाक्याची थंडीसह इतर आव्हाने होती मात्र,तरीही हार न मानता शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा नेटाने फुलवल्याने द्राक्ष हंगाम जोरात सुरू झाला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.