प्रतिष्ठा न्यूज

तासगाव येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बेताल वक्तव्याचा सर्वपक्षीय निषेध… राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस,शे.का.प.,आर पी आय पक्षांच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती.

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव: म.फुले,कर्मवीर भाऊराव पाटील,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवा बद्दल राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेताल चुकीचे वक्तव्ये करून समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचा निषेध करण्यासाठी तासगाव शहरातील एसटी स्टँड चौक डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंबेडकर चळवळीतील सर्व संघटना आंबेडकर प्रेमी सर्व कार्यकर्ते, पुरोगामी विचाराचे नेते व कार्यकर्ते सर्व विरोधी पक्ष कार्यकर्ते यांचे वतीने चंद्रकांत पाटील यांचा निषेध कार्यक्रम आज दुपारी आयोजित केला होता.महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हापासून शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आलेले आहे तेव्हापासून राज्यपाल व सरकारमधील काही आमदार काही मंत्री हे महापुरुषांच्या बद्दल आक्षेपार्य विधान करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे महा पाप करीत आहेत,पाटील यांची मंत्रिमंडळातून तातडीने हाकलपट्टी करावी या मागणीसाठी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी सर्वांचे स्वागत प्रमोद अमृतसागर यांनी केले. तर प्रास्ताविक पत्रकार तथा स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणीचे संचालक राहुल कांबळे यांनी केले. प्राध्यापक एम बी पवार,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष एडवोकेट गजानन खुजट, तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र साळुंखे,मेंढपाळ आर्मीचे अर्जुन थोरात,आरपीआयचे तालुका संघटक उत्तम कांबळे,भास्कर सदाकळे, बाबासाहेब पाटील,अमोल नाना शिंदे, यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बेताल वक्तव्याबद्दल निषेध व्यक्त केला.निषेध व्यक्त केल्यानंतर सर्व पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते तहसील ऑफिस येथे जाऊन तासगावचे तहसीलदार रवींद्र रांजणे यांना निवेदन दिले.यावेळी राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष दत्ता हावळे,मनसेच्या महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख दिपाली पुंडेकर,राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ नलीनी पवार, माजी नगरसेवक सी.पी कांबळे, पंकज अमृतसागर,महाकु मोरे,उपस्थित होते.यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली,यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तासगांव पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रमोद अमृतसागर, राहुल कांबळे, निलेश गव्हाळे,मिलिंद माने,मुन्नाभाई कोकणे,पंकज अमृतसागर यांनी विशेष परिश्रम घेतले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.