प्रतिष्ठा न्यूज

तासगाव नगरपरिषदेने नेमून दिलेल्या स्वच्छता ठेकेदाराचा भोंगळ कारभार… मनसे कडून आंदोलनाचा इशारा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगांव नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठेकेदाराने तासगाव शहरातील स्वच्छतेची तीनतेरा वाजवले आहेत,तासगांव शहरातील काही प्रमुख ठिकाणाच्या रस्त्यांची स्वच्छता केली जाते उर्वरीत शहरातील बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता दिसून येत आहे.नगरपरिषदेने घालून दिलेल्या नियमाच पालन करणे गरजेचे असतानाही कोणत्याही नियमाचे पालन केले जात नाही.
याबाबत आज मनसे नेते अमोल काळे यांनी तासगाव नगरपरिषदेला निवेदन दिले आहे.त्यात त्यांनी म्हंटले आहे,नगरपरिषद हद्दीतील सर्व रस्ते,गल्या, बोळ,सर्व खुल्या जागा,नगरपरिषदेच्या सर्व इमारती, कार्यालय, व्यापारी संकुल शॉपिंग सेंटर इ.ठिकाणची साफसफाई करणे बंधनकारक असून देखील या गोष्टी होताना दिसून येत नाहीत. सायंकाळी बाजारपेठेतील (मच्छी मार्केट व मटन मार्केट सह.)त्या त्या प्रभागातील कचरा उठाव करणे बंधनकारक असतानाही सायंकाळच्या वेळी तो तसाच पडलेला दिसून येतो.
शहरातील सर्व शौचालये,न.प.सर्व सार्वजनिक शौचालये व मुताऱ्या,सर्व शॉपिंग सेंटर मधील शौचालय व मुताऱ्या यांची स्वच्छता दररोज करणे गरजेचे असतानाही स्वच्छता कर्मचारी ती स्वच्छता आठवडयातुन एकदा करताना दिसून येतात.त्यामुळे या भागामध्ये दुर्गंधी पसरत आहे. व अस्वच्छता मोठ्या प्रमाणात निदर्शनास येत आहे.छोटया मोठ्या गटारींची साफसफाई आठवडयातुन १ वेळ करणे गरजेचे असून देखील या कडे ठेकेदार लक्षही देत नसल्याचे दिसून येते.त्यामुळे सभोवतालच्या परिसरात डासांचे प्रमाण वाढलेले आहे.या सर्व प्रकारामुळे तासगांव शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.नगरपरिषदेकडून कोठयावधी रूपये या ठेकेदारास दिले जातात.तरीहि तासगांव करांना अस्वच्छतेला सामोरे जावे लागत आहे.तरी या विषयात आपण स्वतः लक्ष देवून ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी,अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेने दिला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.