प्रतिष्ठा न्यूज

खासदार संजयकाका पाटील यांच्या पाठपुराव्याने तासगाव पंचायत समिती नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास कोट्यवधीचा निधी मंजूर

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव (प्रतिनिधी) : खासदार संजयकाका पाटील यांनी तासगाव पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीस *15 कोटी रुपये* निधी खेचून आणला.
याबाबत अधिक माहिती अशी की,तासगाव पंचायत समिती येथे प्रशासकीय इमारत बांधकाम करणेकरिता खासदार संजय काका पाटील गेले अनेक दिवस प्रयत्नशील होते. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता तत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यावर प्रशासक असल्यामुळे सर्वसामान्य लोकांनी व कर्मचाऱ्यांनी खासदार संजय काका पाटील यांच्याकडे तासगाव पंचायत समितीची प्रशासकीय इमारत ही प्रशस्त स्वरूपात असावी व त्यास मोठा निधी मिळावा अशी सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्यातूनच खासदार संजय काका पाटील यांनी राज्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद मध्ये प्रशासक असताना सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून बांधकामास असलेली स्थगिती उठवुन तब्बल 15 कोटी इतका भरघोस निधी मिळवून आणला. मंगळवार दि. 21 मार्च 2023 रोजी सदर 15 कोटी निधीस महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली.
याबाबत खासदार संजय काका पाटील म्हणाले की, आपल्या तासगाव पंचायत समितीची इमारत ही प्रशस्त स्वरूपात असावी असे सर्वसामान्य जनतेची व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अपेक्षा होती त्या अनुसरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्राम विकास मंत्री  गिरीश महाजन यांनी निधी मंजूर करून मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे जाहीर आभार व्यक्त केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.