प्रतिष्ठा न्यूज

प्रभाग 18 मधील शामरावनगर येथे १ कोटी ५० लाख रुपयेच्या मुख्य रस्त्याच्या कामाचा आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते शुभारंभ

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली प्रभाग 18 मधील शामराव नगर येथील अर्थसंकल्प बजेट २०२२ मधून मंजूर करण्यात आलेले आकाशवाणी ते स्वराज्य चौक ते आण्णा सतगोंडा पाटील नगर ते इनामधामनी रोड हसरा चौक या 1 कोटी 50 लाखाच्या रस्ते विकास कामाचे शुभारंभ आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले..
सदर रस्ता हा हरिपूर कोथळी पूलाला समांतर रस्ता असून हा रस्ता हनुमाननगर येथील मंजूर करण्यात आलेले 25 कोटीचे नाट्यगृहा कडे जाणारा उपयुक्त रस्ता असून सांगलीच्या इतिहासात शामराव नगरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सदर रस्ता मंजूर केला आहे असे प्रतिपादन आमदार सुधीरदादा गाडगीळ यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून आभार मानले केले.,,
या प्रसंगी अमर पडळकर, रोहित जगदाळे, शहाजी भोसले, रोहित बाबर, गीताताई जगदाळे, वैशालीताई पडळकर, जयश्री मगदूम, नाना मगदूम, उमेश नरगुंदे, संपत माळी, विपुल कलादगे, मनोज यमगर, संतोष कदम, गणपती साळुंखे, गौस पठाण ठेकेदार रमेश मोह्नानी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे चंदू गुरव आदि मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.