प्रतिष्ठा न्यूज

जागतिक पाणथळ दिवसा निमित्त शिराळा येथे पक्षी निरीक्षणात नोंदवल्या ४५ पेक्षा जास्त पक्षी प्रजाती

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे 
सांगली : २ फेब्रुवारी दिवस हा दरवर्षी जागतिक पाणथळ दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो.
निसर्गातील एक महत्त्वाची परिसंस्था (इकोसिस्टीम) म्हणून पाणस्थळ परिसंस्थेकडे पाहिले जाते. परंतु ही पाणथळ ठिकाने वेगाने प्रदुषित व नष्ट होत आहेत. वेगवेगळ्या शहरांमध्ये, गावा मध्ये असलेली पाणथळ ठिकाने गेल्या तीन चार दशकात नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पाणस्थळ ठिकाणांचे संरक्षण व्हावे, जनजागृती व्हावी, या साठी जगभरात २ फेब्रुवारी हा दिवस वर्ल्ड वेटलांड डे म्हणून साजरा करण्यात येतो.
या दिनाचे औचित्य साधून  पर्यावरण क्षेत्रात काम करणारी प्लॅनेट अर्थ फाउंडेशन आणि जागतिक दृष्ट्या पर्यावरणावर काम करणारी Earth.org या संस्थेमार्फत शिराळा शहरातील मोरणा धरण येथे पक्षी निरीक्षण आयोजित करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे सदस्य, न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आणि गावातील नागरिक सहभागी झाले होते.
या पक्षी निरीक्षणावेळी पक्षांच्या जवळपास ४५ पेक्षा जास्त प्रजाती आढळून आल्या.
या पक्षी प्रजातीमध्ये प्रामुख्याने वूली प्रवासी ऑफस्प्रे, जागतिक दृष्टीने धोक्यात असलेला पांढऱ्या मानेचा करकोचा, ओपन बिल स्टोर्क, कुदळ्या, लिटिल रिंग प्लॉवर, खंड्या, टिटवी, शेकाटी, ब्राम्हीनी बदक, स्पॉट बेलीड बदक, पानकावळा अशा अनेक पाणस्थळ पक्षांची नोंद करण्यात आली.
यातील बरेचसे पक्षी हे जागतिक दृष्ट्या धोकादायक आणि नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत जी चिंतेची गोष्ट आहे.
मोरणा धरण हा गेल्या काही वर्षात पक्षांसाठी चांगला अधिवास बनले आहे. त्यामुळे सदर मोरणा धरणाच्या परिसरात प्रदूषणकारी प्रकल्प होऊ नयेत, धरणाच्या काठावरची मातीचे उतखणंन करू नये, प्लास्टिक कचरा करू नये, तसेच लोकांनी शेतीमध्ये कमी प्रमाणात रासायनिक खत वापर करावा. सदर पक्षांच्या अधिवासामुळे धरणातील माशांची जैवविविधता टिकून राहण्यास मदत होते , मत्स्य उत्पादन वाढण्यास मदत होते.
सदर पक्षी निरीक्षणाच्या वेळी संस्थेचे सदस्य आकाश पाटील, वन्यजीव फोटोग्राफर अमित माने , वैभव नायकवडी , पर्यावरण अभ्यासक प्रणव महाजन, प्रणव हसबनिस, सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमी डॉ. नितीन जाधव, डॉ.सौ. कृष्णा जाधव, earth.org चे विनायक साळुंखे, विद्यार्थी इ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी सर्वेक्षण ठिकाणचा प्लास्टिक कचरा गोळा केला, विद्यार्थ्यांना पक्षी ओळखण्यासाठी इंडियन बर्ड अँड्रॉइड एप्लीकेशन चा वापर करण्यास शिकवण्यात आले व सिंगल युज प्लास्टिक न-वापरण्याची संदेश दिला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.