प्रतिष्ठा न्यूज

फुलमळा तांडा ते उमरा खांडी 3 किमी चा रस्ता मजबुतीकरण करून देण्याच्या मागणीचे : मंत्री राठोड यांना निवेदन

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील फुलमळा तांडा ते उमरा-खांडी बायपास 3 किमी चा प्रमुख रस्ता डांबरीकरण किंवा सी.सी.मध्ये मजबूत करून देण्याच्या मागणीचे निवेदन नुकतेच कॅबिनेट मंत्री मा.संजय राठोड यांना तांडावासीयांच्या वतीने देण्यात आले आहे.
जवळपास 75 घरांची वस्ती असलेल्या या तांड्याची लोकसंख्या 900 जवळपास आहे. इतर ठिकाणी दळणवळण करण्यासाठी मजबुत रस्ता नसल्याने पावसाळ्यात मुलांना शाळेत जाणे, रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाणे व शेतकऱ्यांना शेतातील माल घरी आणणे किंवा बाजारात नेणे खुप त्रासदायक होत असुन या समस्येवर आपण लवकर रस्ता मजबुती करून देण्याची मागणी मा.संजय राठोड (कॅबिनेट मंत्री) यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी माजी आ.किशनरावजी राठोड, देविदास भाऊ राठोड, उत्तम चव्हाण, भैय्यासाहेब चव्हाण, प्राचार्य राठोड सर, प्रा.बदने सर, उपस्थित होते.
या निवेदनावर ग्राम पंचायत सदस्य- सतीश राठोड, माजी सरपंच- रामराव राठोड, जी.बी.जाधव, नायक- रामा राठोड, रावसाहेब राठोड, गोरख राठोड, संजय राठोड, विजय पवार, राजु राठोड, संतोष जाधव, विकास राठोड, दिलीप राठोड, अनिल जाधव यांच्या सह्या आहेत,

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.