प्रतिष्ठा न्यूज

पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनने जपली माणुसकी : जखमी खेळाडूला केली आर्थिक मदत

प्रतिष्ठा न्यूज / दशरथ मस्कर
नवी मुंबई : दिनांक 24 डिसेंबर रोजी पाटण तालुका अंतर्गत सुरू असणाऱ्या जोतिर्लिंग चषक मधील सामन्या दरम्यान फिल्डिंग करत असताना गलमेवाडी टीमचा एक खेळाडू बॉण्ड्री लगत चेंडू अडवन्याच्या नादात एका खड्यात पडल्याने त्याच्या हाताला मार लागुण जखमी झाल्याने त्यास दवाखाण्यात नेण्यात आले असता तपासणीनंतर समजले की त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे हे जेव्हा आपल्या कमिटीला माहीत पडताच आपल्या असोसिएशनचे सर्वांच्या मदतीला सदैव धावून येणारे सन्माननीय अध्यक्ष श्री.विनोद कदम (स्वामी), खजिनदार अनिलभाऊ दिंडे, व मार्गदर्शक सल्लागार आबा चव्हाण, महाव्यवस्थापक अर्जुन कदम यांनी लगेच तत्परतेने सदर घटनेची दखल घेत कमिटीची तातडीची मिटिंग घेऊन सदर खेळाडूस दवाखान्याचा खर्च म्हणून आर्थिक मदत रुपये 4000/- कमिटीच्या माध्यमातून देण्यात आले.
दरम्यान श्री अनिल दिंडे व आबा चव्हाण यांनी खेळाडू व त्याच्या संपूर्ण टीमला सहानुभूती दाखवून मार्गदर्शन केले तर अध्यक्ष श्री विनोद कदम (स्वामी) यांनी कामामुळे बाहेर असूनदेखील खेळाडूची फोन वरून तबियतीबाबत विचारणा केली व सांत्वन केले.
पाटण तालुका एक वाडी! एक संघ ! मधील प्रत्येक सर्व टीम तसेच खेळाडू फक्त क्रिकेट चा खेळ म्हणून जोडलेला नसून त्यांच्यात सर्वांसाठी माणुसकीची नाळ जोडली गेली आहे.
कोरोना काळातील संकट असो की महापूर वेळोवेळी आपल्या असोसिएशनने मदतीचा हात पुढे केला आहे.
यापुढेही आपले क्रिकेट असोसिएशन प्रत्येकाच्या सुख-दुःखात एकजुटीने सामील होईल.
क्षण जीवनातले समृध्दिने.. उज्वल दिव्यासह उजळून यावे.
नाते आपले परस्परातले.. अगदी अतुट राहावे !

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.