प्रतिष्ठा न्यूज

महाराष्ट्र राज्य सरकारने गुंठेवारी खरेदी विक्री सुरु करावी.खरेदी झाल्यावर रेखाकन मंजूर करून घेण्याची अट घालून प्रमाणभूत क्षेत्र प्रस्तावास मंजुरी द्यावी. ग्रामीण भागास लोक संखेच्या आधारे अकृषक साठी हद्द वाढ करावी या मागणीसाठी आझाद मैदानात तिव्र आंदोलन करणार : चंदनदादा चव्हाण

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राज्यात मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी १२ जुलै २०२१ रोजी परिपत्रक काढून गुंठेवारी खरेदी विकीस जागेचा नकाशा सक्षम अधिकारी यांच्या सही शिक्याचा असल्या खेरीज करता येणार नाही.हे परिपत्रक संभाजीनगर खांडपिठाने रद्द केले. त्यानंतर सरकार वरिष्ठ न्यायालयात गेले. सरकारने हे अपील मागे घ्यावे._

_दि.५ मे २०२२ रोजी शासन राजपत्र किमान प्रमाणभूत क्षेत्र शहरी भाग सोडून १० आर बागायत व जिरायत २० आर क्षेत्र निश्चित करून तीन महिन्यात हरकती मागवल्या. सरकार मात्र यावर निर्णय घ्यायला तयार नाही. तात्काळ यास मंजुरी द्यावी._

_शासन परिपत्रक दि.१४ मार्च २०१८ रोजी ग्रामीण भागात गावठाण हद्दी पासुन २०० मी. परिघीय क्षेत्रातील जमिनी अकृषक रूपांतर करण्या बाबत प्रक्रिया सुरु आहे. मात्र राज्यातील ग्रामीण भागात लोकसंखेच्या आधारे हद्द वाढ देऊन १००० मी करावी. या परिपत्रकात सुधारणा करणेत यावी._

या मागण्यासाठी जानेवारी महिन्यात शिवसेना गुंठेवारी विकास समिती, महाराष्ट्र राज्य. ( मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मुंबई येथे लोकशाही मार्गाने तीव्र जन आंदोलन करणार आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांनी दिली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.