प्रतिष्ठा न्यूज

संयोगिता पाटील केंब्रिज स्कूल ची शहरातील एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफिस येथे सहल

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : संयोगिता पाटील केंब्रिज स्कूल आणि ज्यु. कॉलेज, मिरज मधील इयत्ता 5 वी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी मिरज येथील रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, पोस्ट ऑफीस पाहणे व तेथील कामकाजविषयी माहिती जाणून घेण्याकरीता विद्यार्थ्यांना नेले होते. विद्यार्थ्यांना फक्त शाळेचा अभ्यासच गरजेचा नसून आपल्या आजूबाजू असणा-या सोई सुविधांची माहिती ही असणे गरजेचे आहे हे पटवून देण्याचे काम शाळा करीत असते. मुले स्वावलंबी व्हावीत व पुढील काळात त्यांना प्रोत्साहन मिळुन त्यांच्या अंगी धाडस यावे याकरीता सदर शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते.
तसेच विद्यार्थ्यांना रेल्वे स्टेशनवर मा. मनोज कुमार (सिनियर सिग्नल इनचार्ज) यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अमोल दबडे सरांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मुलांना माहिती सांगताना रेल्वेचे काम कसे सुरिळत चालते, कोणकोणत्या शाखा एकत्र येवून काम करतात. टीसी चा रोल, आरपीएफ काय काम करते. तसेच आपण रेल्वे स्टेशनवर गेल्यावर काय व कशी काळजी घेतली पाहिजे हे मुलांना समजावून सांगितले. रेड सिग्नल असेल तर ड्रायव्हरची काय भूमिका असते अशा अनेक गोष्टी मुलांना सांगण्यात आल्या.
बस स्टॅन्ड वर कोणकोणत्या बसेस असतात त्या वेळापत्रकानुसार कशा ये-जा करतात. त्यांचा कोणता थांबा असतो तसेच ड्रायव्हर, कंडक्टर यांना काय करावे लागते. या सर्वाची मुलांनी पाहणी केली. पोस्ट ऑफीस आताच्या युगात क्वचितच वापरले जाते. इंटरनेटमुळे हे सर्व काम सोपे झाले आहे. परंतु पोस्ट ऑफिस अजूनही तेवढेच तत्पर आहे. हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिस दाखविण्यात आले. पोस्ट ऑफिस मध्ये काय व कसे कामकाज चालते ते सर्व मुलांनी निरीक्षण केले.
मुलांना आर्थिक व्यवहाराबद््दल समजावून सांगण्यासाठी मुलांना एटीएम मशीन बद्दल सांगण्यात आले. तसेच पेसे कसे काढावे, मशीन कसे काम करते हे प्रात्यक्षिकाद्वारे सांगण्यात आले. आमच्या या उपक्रमात रेल्वे स्टेशनचे मास्टर मा. तांदळे यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. श्रीदेवी कुल्लोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शैक्षणिक सहल घेण्यात आली. या सर्व ठिकाणी विद्यार्थी उत्सुकतेने व लक्षपुर्वक माहिती घेत होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.