प्रतिष्ठा न्यूज

मिरज उरुसात महापालिकेच्या स्टॉलवरून 110 किलो खताची विक्री

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने आणि स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत मिरजेतील मिरासाहेब दर्ग्यासमोर उरसानिमित निमित्त लावण्यात आलेल्या खत विक्री केंद्रातून 110 किलो खताची विक्री झाली आहे. आयुक्त सुनील पवार मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या सूचनेनुसार
मिरज उरसामध्ये कचऱ्यापासून बनविलेल्या खतांच्या विक्रीचा स्टॉल लावण्यात आला होता. या विक्री केंद्रातून सहा दिवसात 110 किलो खताची विक्री झाली आहे. अजूनही खत विक्री होत असून महापालिकेच्या वतीने कचऱ्यापासून प्रक्रिया केलेल्या खताला मागणी वाढत आहे. हा खत विक्रीचा स्टॉल सहायक आयुक्त अशोक कुंभार यांच्या नियंत्रणाखाली आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, अनिल पाटील, ओ एस डब्ल्यूच्या स्वच्छता निरीक्षक अंजली कुदळे यांची टीम कार्यरत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.