प्रतिष्ठा न्यूज

संभाजी ब्रिगेड च्या वतीने प्रबोधनात्मक शिवजयंती साजरी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : गड किल्ले यांचे संवर्धन करणे ही प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य व जबाबदारी आहे. महापुरुषांचे दैवीकरण करू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुसरे रूप आहे. असे विचार संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री युवराज शिंदे यांनी व्यक्त केले.. काल सांगलीमध्ये ठिकठिकाणी शिवजयंती साजरी होत होताना संभाजी ब्रिगेडच्या संघटक विजय लांडगे यांनी मावळ्याची वेशभूषा करून सांगलीमध्ये ठिकठिकाणी एक पात्री प्रयोगातून सामाजिक संदेश दिला.दिवाळीत खोटे किल्ले सजवता व त्याची काळजी घेता आणि खऱ्या किल्ल्याकडे मात्र दुर्लक्ष करता.हे विचार त्यांनी नाटकातून मांडले हा एकपात्री प्रयोग बौद्ध धर्म संस्कार संघ सांगली. भीम नगर सांगली. व विश्रामबाग परिसर या ठिकाणी एक पात्री प्रयोगातून त्यांनी सामाजिक संदेश दिला. आणि संभाजी ब्रिगेड सांगली यांनी शिवजयंती एक अनोख्या पद्धतीने साजरी केली छत्रपती शिवाजी महाराजांचे बहुजनाचे स्वप्न हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान देऊन पूर्ण केले आहे. असा विचार त्यांनी मांडला. या एकपात्री प्रयोग कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष माननीय युवराज शिंदे तसेच बौद्ध धर्म संस्कार संघाचे सचिव पवन वाघमारे,राहुल कांबळे, दिपाली कांबळे, शैलजा साबळे, प्रकाश शिवशरण, रणजीत माने, यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.