प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या श्रींचा उद्या मंगळवारी 245 वा वाढदिवस…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: श्री गणपती पंचायतन देवस्थान ट्रस्ट तासगाव श्री गणेशाचा उद्या 245 वा वाढदिवस साजरा होत आहे.श्री मंदिराचे संकल्पक आणि संस्थापक श्रीमंत सर सेनापती परशुराम भाऊ पटवर्धन यांनी इसवी सन 1779 मध्ये फाल्गुन शुक्ल 2 शक्य सतराशे एक या शुभ दिनी श्री गणपतीरायांची प्रतिष्ठापना तासगावात केली. परशुराम भाऊंनी प्राणप्रतिष्ठापना दिन हा श्रींचा वाढदिवस म्हणून साजरा करण्याची 245 वर्षांपूर्वी परंपरा सुरू असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी दिली.त्यानुसार यंदाचा 245 वा वाढदिवस उद्या मंगळवारी साजरा होत असून श्री 246 व्या तारुण्य वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या निमित्ताने उद्या सकाळी 108 विविध द्रव्यांनी श्रींचा अभिषेक घालण्यात येणार आहे.त्यानंतर होमहवन,दुपारी कीर्तन,सायंकाळी छबिना निघणार आहे. यावेळी बोलताना विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी गेल्या 245 वर्षापासून अखंडितपणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत असून त्यात आतापर्यंत कुठलाही खंड पडलेला नाही, तसेच वाढदिवस साजरा करण्याचा उद्देश असा की लोकांच्या भक्तीत वाढ व्हावी,गाव समृद्ध व्हावं,गावाची प्रसिद्धी व्हावी असा असल्याचे सांगितले.तसेच भाविकांनी उद्या मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रींना भक्तीपूर्वक शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन जाण्याचे आवाहन श्री गणपती पंचायतन देवस्थान ट्रस्ट विश्वस्त राजेंद्र परशुराम,सौ.सितारा राजेंद्र पटवर्धन,राहुल राजेंद्र पटवर्धन,महाव्यवस्थापक पवनसिंह कुडमल,अथर्व जोशी,अशोक कुंभार,पंडित अनंतशास्त्री आणि दिपकशास्त्री जोशी यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.