प्रतिष्ठा न्यूज

कै.पद्मिनबाई भरकडे यांच्या स्मरणार्थ मराठा समाजातील मुलींच्या वसतिगृहाला 11 हजार रुपयांची मदत : बळीराम पाटील यांचा स्तुत्य उपक्रम

 प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : भारतीय संस्कृतीमध्ये दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे.विविध पर्वकाळात विविध प्रकारचे दान करावे. हे आपली संस्कृती शिकवीते. या पर्वकाळात दान केल्याने पुण्य प्राप्त होते.असा एक समज आहे.
मनुष्य जीवनात दान ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जाते. प्रत्येक व्यक्तीने काहीना काही दान करावे. असे आपले शास्त्र सांगते. दान केल्याने व्यक्ती मोह, माया, मत्सर यांसारख्या प्रवृत्तीनपासून दूर राहतो असे म्हणतात. त्यामुळे आपली संस्कृती दानी संस्कृती म्हणून ओळखली जाते.
याचाच प्रत्यय लोहा तालुक्यातील कामळज येथील आदर्श नागरिक बळीराम संभाजी पाटील भरकडे यांच्या आई कै. पद्मिनबाई संभाजी भरकडे यांचे दि.27 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. त्या निमित्ताने त्यांनी आपल्या आईच्या गोडजेवना निमित्त- ह.भ.प.मधुकर महाराज बारूळकर यांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन व्हावे या हेतूने किर्तनाचा कार्यक्रम ठेऊन आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदार्थ हेतूने नांदेड येथे मराठा सेवा संघ यांचे कडुन चालविण्यात येत असलेल्या मराठा मुलींच्या वसतिगृहाला आईच्या स्मरणार्थ (दान) म्हणून 11000 (आकरा हजार) रुपयांची मदत केली. त्यांचा पुण्यदानाचा हा उपक्रम समाजासाठी आदर्श ठरणारा आहे.
यावेळी ह.भ.प.मधुकर महाराज बारुळकर, इंजि.शे. रा.पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी- रेखाताई काळम (कदम), माजी कृषी सभापती- नरहरी वाघ, बळीराम पाटील, पंडितराव पवळे, प्रल्हादराव धुरपडे, पंडित कदम, प्रताप धोंडगे, विनायक कदम, पंडित कदम मंगलसांगवीकर, यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.