प्रतिष्ठा न्यूज

गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट डी. एड्. कॉलेज यांच्यावतीने गिरलिंग /जुना पन्हाळा (कुकटोळी) येथे ट्रेकींग

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट डी. एड्. कॉलेज यांच्यावतीने महिला दिनानिमित्त व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त ट्रेकींगचे आयोजन केले होते. सदर ट्रेकींग गिरलिंग /जुना पन्हाळा (कुकटोळी) येथील 16 किमी चे अंतर पार करून यशस्वी पूर्ण केले. गिरलिंग ट्रेक पूर्ण करीत असताना विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद व उत्साह होता, ट्रेकिंग मध्ये गिरलिंग येथील महाराज व कुकटोळी येथील ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी व विकास सेवा सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांचा प्रतिसाद व सहकार्य मिळाले. हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील, विश्वस्त विरेंद्र पाटील आणि कॅम्पस कोऑडीनेटर डॉ. सतिश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

तेथील ट्रेकिंग एक अविस्मरणीय अनुभव होता. गिरलिंग येथील निसर्ग सौंदर्य व शिवाजी महाराजांनी गडाची तटबंदी बांधलेली आहे. एकूणच अनुभव हा शब्दात व्यक्त करताना शब्दच सुचत नाही. अशी भावना सर्व विद्यार्थ्यांची होती.

जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करावा लागतो. असे प्राचार्य डॉ. बिभीषण कराळे म्हणाले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या उपक्रमात सहभागी प्रशिक्षणार्थींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व पेन देऊन सन्मानित करण्यात आले. ट्रेकिंग चे नियोजन प्राध्यापिका अस्मिता कोडग व दिव्या पाटील, सुनिल पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बिभीषण कराळे होते. सूत्रसंचालन सना सनदी व आभार नईफा शरीकमसलत यांनी मानले. या उपक्रमात ग्रंथपाल स्नेहा जोशी, शिल्पा गरड याही सहभागी झाल्या होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.