प्रतिष्ठा न्यूज

महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्वर्गीय धोंडू मामा साठे यांची जयंती उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : म.टे.ए. सोसायटीचे संस्थापक स्वर्गीय धोंडूमामा साठे यांची 84 वी जयंती आज उत्साहात संपन्न झाली.या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन पृथ्वीराज ( बाबा) देशमुख, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद केळकर, संस्थेचे सचिव श्री. सुरेंद्र चौगुले तसेच संस्थेचे सर्व अधिकारी पदाधिकारी सर्व शाळांचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय धोंडूमामा साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. प्रसाद केळकर यांनी धोंडूमामा साठे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा आढावा त्यांच्या मनोगतातून व्यक्त केला.
तसेच धोंडूमामा साठे यांच्या जन्मापासून ते त्यांच्या विचारांचा व त्यांच्या कर्तुत्वाचा आढावा त्यांनी आपल्याला दिलेला वारसा संस्थेसाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न या सर्वाचा इतिहास संस्थेचे सचिव श्री. सुरेंद्र चौगुले यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केला. सौ. सना इनामदार, सौ. विद्या जावीर, सौ. प्राजक्ता कुलकर्णी या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रातील एका विषयाची निवड करून त्या संदर्भातील त्यांचे मनोगत या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये संस्थेचे चेअरमन माननीय पृथ्वीराज (बाबा) देशमुख यांनी सोसायटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमाबद्दल त्याच्या यशस्वी घौडदौडीबद्दल अभिमानाने सांगितले तसेच, नव्याने सुरू करणार असलेल्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या चांगल्या कामाबद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच धोंडूमामा साठे यांच्या 1 सप्टेंबर 2025 पासून येणाऱ्या जयंतीनिमित्त शिक्षण क्षेत्रामध्ये समाजाभिमुख कार्य करणाऱ्या व्यक्तीस शिक्षणमहर्षी, थोर स्वातंत्र्यसेनानी, स्वर्गीय धोंडू मामासाठे यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करणार असल्याचे संस्थेचे चेअरमन माजी आमदार पृथ्वीराज( बाबा) देशमुख यांनी घोषित केले. यानंतर कार्यक्रमाचे आभार सौ. वैदैही कुलकर्णी यांनी मानले. व कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कीर्ती गायकवाड यांनी केले.
या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन मा.पृथ्वीराज (बाबा) देशमुख उपाध्यक्ष डॉ.प्रसाद केळकर सचिव श्री. सुरेंद्र चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.