प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई व चालकांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी परिक्षा पुर्ण ; चाचणीचे गुण संकेतस्थळावर प्रसिध्द

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई पदांकरीता २७ रिक्त पदे, चालक पोलीस शिपाई पदांकरीता १३ रिक्त पदे अशा एकुण ४० रिक्त पदांकरीता एकुण १७५६ अर्ज प्राप्त झाले होते. दिनांक १९/०६/२०२४ ते २१/०६/२०२४ या दरम्यान सदर भरती प्रक्रियेत प्रमाणपत्र तपासणी, शारीरिक चाचणी व उमेदवारांची मैदानी चाचणी सांगली पोलीस मुख्यालय मैदान येथे घेणेत आली.

पोलीस शिपाई पदाकरीता ७६० पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणी करीता बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ४४९ उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी, शारीरिक चाचणीत पात्र झाल्यानंतर त्यांनी मैदानी चाचणी पुर्ण केली आहे. तसेच महिला पोलीस शिपाई पदाकरीता १४२ महिला उमेदवारांना मैदानी चाचणी करीता बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ६९ उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी व शारीरिक चाचणीत पात्र झाल्यानंतर त्यांनी मैदानी चाचणी पूर्ण केली आहे.

पोलीस शिपाई चालक पदाकरीता ८१३ पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणी करीता बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ४९८ उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी, शारीरिक चाचणीत पात्र झाल्यानंतर त्यांनी मैदानी चाचणी पूर्ण केली आहे. तसेच महिला पोलीस शिपाई चालक पदाकरीता ४१ महिला उमेदवारांना मैदानी चाचणी करीता बोलाविण्यात आले होते. त्यापैकी २० उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी व शारीरिक चाचणीत पात्र झाल्यानंतर त्यांनी मैदानी चाचणी पूर्ण केली आहे.

सांगली जिल्हा पोलीस भरती करीता दि. १९/०६/२०२४ ते दि. २१/०६/२०२४ रोजीचे शारीरिक व मैदानी चाचणी करीता उपस्थित राहिलेल्या उमेदवारांचे गुणपत्रक सांगली जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिध्दीपमाध्यम sp.sangli@mahapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. तसेच उमेदवारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी सदरची माहिती पोलीस अधीक्षक, सांगली यांचे कार्यालयाबाहेर य पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, सांगली या ठिकाणी लावण्यात आलेली आहे.

प्रसिध्द करण्यात आलेल्या शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी गुणांबाबत उमेदवारांच्या काही तक्रारी / हरकती असल्यास तसेच नमुद सर्व माहितीच्या (नांव, जात, आवेदन, सामाजिक व समांतर आरक्षण, एनसीसी प्रमाणपत्र इ.) अनुशंगाने काही आक्षेप असल्यास आपण दि. २४/०६/२०२४ रोजी १२.०० वाजेपर्यत सायबर पोलीस ठाणे दुरध्वनी क्र. ०२३३-२६७२२०० या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा sp.sangli@mahapolice.gov.in या ईमेलवर आपली हरकत पाठविण्यात यावी. दिलेल्या

कालावधीनंतर आलेल्या तक्रारी / हरकतीचा विचार केला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

सदर सांगली जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया ही व्हिडीओग्राफी, सीसीटीव्ही मध्ये चित्रीत करुन पारदर्शक पद्धतीने राबविली गेल्याने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसुन सदरची भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी व्यवस्थित पार पडली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.