प्रतिष्ठा न्यूज

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे पसायदान विद्यामंदिर, सांगली येथील विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) सांगली शहरजिल्ह्याचे अध्यक्ष श्री. संजय बजाज साहेब व युवक अध्यक्ष श्री. राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, सांगली जिल्हा विधानसभा क्षेत्र महिला अध्यक्षा डॉ. छाया जाधव यांनी माननीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पसायदान प्रशालेच्या प्रांगणात निबंधलेखन व चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ आज सोमवार दिनांक ११/०३/२०२४ रोजी पसायदान शिक्षण संस्था संचलित पसायदान विद्यामंदिर व पसायदान माध्यमिक विद्यामंदिर या प्रशालेत घेण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, महिला अध्यक्षा डॉ. छाया जाधव, माजी नगरसेवक हरिदास पाटील, अनिता पांगम, अभिजीत रांजणे, आदर्श कांबळे, मोहन निकम, मोहम्मद शेख या सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने सोहळ्याचा शुभारंभ झाला.
११८ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यातून नंबर काढून यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते करियर साठी उपयुक्त अशी पुस्तके बक्षीस म्हणून दिली. डॉ. छाया जाधव यांनी विद्यार्थ्यांमध्ये लेखन जागृती व्हावी या हेतूने स्पर्धेचे उद्दिष्ट स्पष्ट करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सचिन जगदाळे यांनी चित्रकला स्पर्धेचा धागा पकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच अनेक क्षेत्रातील महत्त्व स्पष्ट केले. अभिजीत रांजणे यांनी बक्षीस म्हणून वितरित केलेल्या पुस्तकांची वैशिष्ट्ये, महत्त्व, स्पर्धा परीक्षा, स्पर्धेचे युग इत्यादि मुद्दे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. पसायदान शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री करांडे सर यांनी प्रास्ताविक केले, तर मुख्याध्यापिका शुभांगी पाटील मॅडम यांनी आभार मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.