प्रतिष्ठा न्यूज

सहयोग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र तमदलगे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरे

प्रतिष्ठा न्यूज
जयसिंगपूर प्रतिनिधी : सहयोग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र,तमदलगे येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी व्यसनमुक्ती केंद्रातील सर्व बांधवाना सौ. वैशाली निर्मळे ताई यांनी राख्या बांधल्या व तुमची व्यसनमुक्ती हीच माझ्यासाठी रक्षाबंधनाची ओवाळणी आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे सचिव *श्री.प्रशांत मल्लाडे(सर)* आणि संस्थापक अध्यक्ष *श्री. सुशांत मल्लाडे(सर)* यांनी व्यसनमुक्ती काळाची गरज यावर आपले मनोगत व्यक्त केले व पुष्पगुच्छ देऊन ताईंचे आभार मानले.तसेच सर्वाना मिठाई व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी केंद्राचे कौंसिलर व सेंटर इनचार्ज शेखर जगताप व केंद्राचे सपोर्टिंग स्टाफ आशिष नख्खा व इतर कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.