प्रतिष्ठा न्यूज

सांगली विधानसभेसाठी राष्ट्रवादीने मला उमेदवारी द्यावी : महिला प्रदेश सरचिटणीस जयश्री पाटील यांची अजित दादांकडे मागणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली विधानसभेसाठी राष्ट्रवादीने उमेदवारी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सरचिटणीस जयश्री पाटील यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात म्हंटले आहे की, सांगली विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. लाडकी बहिण योजनेमुळे सध्या महिलांमध्ये युती सरकारबद्दल मोठी सहानुभूती आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला सरचिटणीस म्हणून काम करत असताना गेल्या अनेक महिन्यात पक्ष वाढीसाठी आणि महिलांच्या संघटनात्मक बांधणीसाठी मी काम केले आहे. पक्षाचे विचार , उपक्रम वेळोवेळी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून पक्ष बळकटीसाठी काम केले आहे. सांगली विधानसभा मतदार संघात महिलांच्या मध्ये मी लोकप्रिय आहे. त्यामुळे पक्षाने विधानसभेसाठी मला संधी दिल्यास सांगलीची जागा नक्कीच राष्ट्रवादी जिंकू शकेल. मागील विधानसभा निवडणूक मी लढविली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाकडून सांगली विधानसभेसाठी मला उमेदवारी द्यावी अशी मागणीही जयश्री पाटील यांनी केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.