प्रतिष्ठा न्यूज

वसंतदादा कुटुंबियांचे मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात डॉ. मधु यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगलीत दादा कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री चंद्रकांत दादा पाटील,माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांनीही प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांची दुरध्वनी त्यांचे सांत्वन केले.
माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या भगिनी डॉ. मधु यांचे काल पुण्यात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. आज दुपारी पद्माळे (ता मिरज) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सांगली दौऱ्यावर होते. त्यांनी दुपारी डॉ. मधु यांच्या निधनाबद्दल प्रतीक पाटील, विशाल पाटील यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित कुमार गेडाम, आनंदराव पवार उपस्थित होते.
तसेच पद्माळे येथील अंत्यसस्करवेळी माजी मंत्री तथा आमदार विश्वजीत कदम,आमदार विक्रम सावंत, आमदार पी. एन. पाटील ,आमदार सुधिर गाडगिळ,पृथ्वीराज पाटील,जितेश कदम,महेंद्र लाड यांच्यासह सांगलीतील विविध पक्षांचे राजकीय नेते पदाधिकारी,मित्र परिवार यांनीही वसंतदादा कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
सोमवारी रक्षा विसर्जन
दरम्यान, सोमवारी ता १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता पद्माळे येथे रक्षा विसर्जन होणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.