प्रतिष्ठा न्यूज

दि. ९ डिसेंबर रोजी सांगली निवारा भवन येथे भव्य मेळावा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्रातील पंधरा लाख बांधकाम कामगारांचे थकीत अर्ज त्वरित मंजूर करून त्यांना लाभ द्या अन्यथा तीव्र आंदोलनाच्या तयारीसाठी ९ डिसेंबर 2022 रोजी सांगली निवारा भवन येथे भव्य मेळावा.

अखिल भारतीय बांधकाम कामगार कन्फिडरेशन आयटक या संघटनेच्या उपाध्यक्षपदी कॉ शंकर पुजारी यांची निवड व इतर कार्यकर्त्यांच्या महत्त्वाच्या निवडीबद्दल सांगलीत सत्कार कार्यक्रम संपन्न !
देशातील बहुसंख्य राज्यातील बांधकाम कामगार संघटनांचे अधिवेशन आंध्र प्रदेशमधील राजमुंद्री येथे तारीख 26 व 27 नोव्हेंबर 2022 रोजी पार पाडले. या अधिवेशनामध्ये कॉ शंकर पुजारी यांची अखिल भारतीय पातळीवर उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. तसेच महाराष्ट्र राज्य आयटक कामगार संघटनेचे सचिव म्हणूनही कॉ शंकर पुजारी यांची निवड झाली आहे.
कॉ शंकर पुजारी हे मागील पन्नास वर्षापासून SFI विद्यार्थी संघटना व कामगार चळवळीमध्ये कार्यरत आहेत.
विशेषता यंत्रमाग कामगार, बीडी कामगार ,बांधकाम कामगार, आशा महिला, झोपडपट्टीवासिय, कुष्ट्रुरुग्ण व बेघराना संघटित करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक महत्वाच्या आंदोलनामध्ये त्यांनी भागीदारी केलेली आहे.
तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठावाडा विद्यापीठाला देण्यासाठीचे इचलकरंजी मध्ये 1980 मध्ये आंदोलन झाले होते. त्यावेळेस कॉ शंकर यांच्यासह 51 कार्यकर्त्यांनी कळंबा जेलमध्ये कारावास स्वीकारलेला आहे. सध्याही देशपातळीवर बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
महाराष्ट्रातील आशा व गट प्रवर्तक महिलांच्या नेत्या कॉ सुमन पुजारी यांची महाराष्ट्र राज्य आयटक कामगार संघटना उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे.
तसेच अखिल भारतीय पातळीवरील बांधकाम कामगार कनफेडरेशनच्या जनरल कौन्सिल पदी प्रा. शरयू बडवे सांगली, कॉ संतोष बेलदार आरग, कॉ रमेश जाधव ठाणे ,कॉ सुनील पाटील पालघर व कॉ प्रकाश गोरे सरपंच परभणी यांचीही निवड झालेली आहे.
तसेच महाराष्ट्र राज्याच्या आयटक कौन्सिल पदी प्रा. शरयू बडवे, कॉ विशाल बडवे, कॉ विद्या भालेकर, कॉ अंजली पाटील, कॉ विद्या कांबळे, कॉ पल्लवी पारकर, कॉ रोहिणी कांबळे, कॉ सुनील पाटील, कॉ साबिरा शेरेकेर व इंदुमती येल्मर यांची निवड झाली आहे.
देशाच्या कामगार चळवळ मधील महत्त्वाच्या कामगार संघटनांच्या मध्ये निवड झाल्याबद्दल सांगली जिल्ह्यातील कामगारांनी या कामगार नेत्यांचे जोरदार स्वागत केलेले आहे.
असे पत्रक निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या जनरल सेक्रेटरी प्रा. शरयू बडवे यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.