प्रतिष्ठा न्यूज

“आपली यारी, जगात भारी..!!” म्हणत मैत्रिदिनाचे औचित्य साधून तब्बल १९ वर्षांनी भरला मित्रमेळा

प्रतिष्ठा न्यूज
बारामती(प्रतिनिधी) : बारामती येथील विद्या प्रतिष्ठान या नामांकित संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सन- २००४ (१२वी) विज्ञान बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मैत्रिदिनाचे औचित्य साधून तब्बल १९ वर्षांनंतर पार पडला. या स्नेहमेळाव्याचे आयोजन हॉटेल सेंट्रलपार्क, बंडगार्डन, पुणे येथे करण्यात आले होते.
या स्नेहमेळाव्यास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल ६५ विद्यार्थी उपस्थित होते. या स्नेहमेळाव्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे परदेशातूनही काही विद्यार्थ्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन आपला सहभाग नोंदवला होता. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींना भेटून आपल्या कॉलेज जीवनातील सुप्त आठवणींना नव्याने उजाळा दिला. एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर एकमेकांना भेटत असल्याने सर्वांचे चेहरे आनंदाने ओसंडून वाहत होते. खास मैत्रिदिनाचे औचित्य साधून हा स्नेहमेळावा आयोजित केला असल्याने त्यास एक वेगळंच स्वरूप प्राप्त झालं होतं. सर्वांनी आपली ओळख करून देत करत असलेल्या कामकाजाचा व कार्यक्षेत्राचा आढावा घेतला जेणेकरून भविष्यात एकमेकांना मदत करता येईल
आपले पद, प्रतिष्ठा, कामाचा व्याप बाजूला ठेवून सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले होते. कोरोनामुळे व इतर कारणामुळे गमावलेल्या मित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भविष्यात आपल्या मित्रांना अडीअडचणीत मदत करण्याचा व एकमेकांच्या पाठिशी उभे राहण्याचा तसेच सामाजिक जबाबदारीच भान ठेवून स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून समाजोपयोगी काम करण्याचा निर्धार सर्वांच्या संमतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन अर्चना झांजुरने, डॉ. समिर जाधव, श्रीकांत कदम, पूनम गवळी, राम पाटील, अमितराजे भोसले, स्वप्नाली नाळे, सचिन साबळे, प्राजक्ता मेथवडे, संदीप लव्हे, स्वप्नील पानसे, अमोल फडतरे, प्रदीप शितोळे, ज्योती शितोळे, कल्पना कापसे, देविका शिंदे, यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. आरती सर्वगोड, प्रियंका भोसले, ॲड. सागर गावडे यांनी केले. अभिजीतसिंह चांदगुडे यांनी सर्वांचे आभार मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.