प्रतिष्ठा न्यूज

खा.हेमंत पाटील यांच्या वरील खोटे गुन्हे मागे घ्या: शिवसेनेची मागणी: तहसीलदार यांना दिले निवेदन

प्रतिष्ठा न्यूज
नांदेड/ मुदखेड : खा. हेमंत पाटील यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, असे निवेदन मुदखेड तहसीलदार यांना शिवसेना तालूका प्रमुख संजय पाटील कुरे व शहरप्रमुख सचिन माने पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

नांदेड येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे दवाखान्यातील अस्वच्छता,अपुरा औषधी तुटवडा, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे चाळीसजणांचा मृत्यू झाला,
असल्यामुळे अधिष्ठाता डॉ. वाकोडे व त्यांचे सहकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. खा. हेमंत पाटील यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, ते गुन्हे लवकरात लवकर मागे घेण्यात यावे, याकरिता मुदखेड तालुक्यातील शिंदे गट शिवसैनिकांतर्फे पोलीस निरीक्षक वसंत संप्रे यांना सुद्धा यावेळी निवेदन देण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष संजय पाटील कुरे, शहराध्यक्ष सचिन माने, शंकर पा. पवार, बाजार समितीचे संचालक सुरेश शेटे, तालुका संघटक पंजाब पा. मुंगल, आनंदराव जाधव, कैलास मुंगल, दिपक ककुर्ले , माधव गायकवाड, रामेश्वर लोकरे, योगेश पवार, बाळु जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.