प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या श्री गणेश नागरी सह.पतसंस्थेच्या स्वि.संचालकपदी सौ.वर्षा राहुल कांबळे व सौ पुष्पा झाडबुके यांची बिनविरोध निवड

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव येथील व्यापारी वर्ग व सभासद बांधवाच्या पसंतीस उतरलेली शहरातील सतत ऑडिट वर्ग ” अ “असलेली श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तासगावचे स्विकृत संचालक पदी माजी संचालिका सौ.वर्षा राहुल कांबळे व सौ.पुष्पा जगन्नाथ झाडबुके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निवडीसाठी संस्थेचे चेअरमन रामभाऊ माळी व व्हा.चेअरमन संभाजी सूर्यवंशी संस्था संस्थापक चेअरमन अरूण उर्फ बाळासाहेब दादा कुलकर्णी, प्रा.एम.बी.उर्फ बटू पवार सर यांचे विशेष सहकार्य लाभले.संचालिका  म्हणून बिनविरोध निवड करण्यात आलेवर दोन्ही नूतन संचालिकांचा सत्कार सौ अपर्णा रमेश कदम व चेअरमन रामभाऊ माळी,व्हा चेअरमन संभाजी सूर्यवंशी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.संस्थेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक राहुल कांबळे यांच्या सौ वर्षा कांबळे पत्नी आहेत.यावेळी संचालक मारूती आण्णा गुरव,राहुल कांबळे,मिलिंद  बोडके,मुन्नाभाई जमादार,चंद्रकांत गेंड, हरीभाऊ पवार,राजेंद्र मानकर, श्रीमती पवार,सचिव रामचंद्र लांडगे,वादवणे इ.उपस्थित होते.
विशेष म्हणजे सौ वर्षा कांबळे व सौ पुष्पा झाडबुके यांनी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थाचे पाच वर्षे संचालिका म्हणून काम केले होते, संस्थेच्या बिनविरोध निवडणूकीत सौ वर्षा राहुल कांबळे व सौ पुष्पा झाडबुके यांचा सिंहाचा वाटा होता.संस्थेचे चेअरमन श्री रामभाऊ माळी यांच्या अध्यक्षतेखाली गतवर्षी झालेल्या नफा प्रमाणे  यंदाही सर्व संचालक संचालिका कर्जदार  सभासद व कर्मचारी यांच्या सहकार्याने पंचवीस लाख रुपये इतका नफा मिळाला आहे.सौ वर्षा कांबळे व सौ झाडबुके यांच्या बिनविरोध निवडीमुळे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत असून दोघी संचालिका यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.