प्रतिष्ठा न्यूज

आरोग्य दिनानिमित्त रुग्ण हक्क सनद फलकाचे अनावरण करणारी प्रथम ग्रामपंचायत सावळी : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.माने यांची माहिती

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : सावळी ता. मिरज येथील ग्राम पंचायतीच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने रुग्ण हक्क माहिती फलकाचे अनावरण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त प्रथम महिला सरपंच सन्मतीताई कुबेर गणे होत्या. याप्रसंगी आरोग्य अधिकारी माने यांनी राज्यात सर्वप्रथम महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट मधील तरतुदीनुसार  रुग्ण अधिकाराची माहिती असणारे जनजागृती चे फलक लावणारी सावळी ही ग्रामपंचायत कौतुकास पात्र आहे. शासनाच्या आदेशानुसार सर्व हॉस्पिटल ना रुग्णहक्काची सनद, तक्रार निवारण कक्ष व टोल फ्री नंबर सह, तरतुदीची तातडीने अंमलबजावणी करण्याचे सूचना दिल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.  सध्याची परिस्थिती लक्षात घेता मास्क लावण्याचे आवाहन केले. याप्रसंगी डॉ. रघुनाथ शिंदे, डॉ. आदित्य शिंदे, दीपक कारंडे, बजरंग माळी, अबू समलेवाले, उषाताई शिंदे, कल्पना शिंदे, धर्मप्रिया कांबळे, फैरोजा मुलानी, आशा वर्कर आदींचा रुग्ण हक्क सनद पॉकेट व गुलाब पुष्प देऊन आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आले. स्वागत आरोग्य हक्क समितीचे उपाध्यक्ष राजेश साळुंखे व प्रास्ताविक शाहीन शेख यांनी केले. यावेळी रमजान खलिफा, कल्लाप्पा कोळी, सचिन आर वाळे, महंमद खाटीक, रफिक शेख, कोल्हापूर जिल्हा आरोग्य हक्क समिती कार्याध्यक्ष दत्ता मांजरे, पत्रकार हातकलंगले योगेश पांडव आधी रुग्ण हक्क कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.*
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.