प्रतिष्ठा न्यूज

विसापूरात 101 रक्तदात्यांचे रक्तदान

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : राज्यात सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवू लागला आहे.अनेक ठिकाणी अपघात अथवा मोठ्या शस्त्रक्रियांवेळी रक्ताची कमतरता भासू लागली आहे.त्यामुळे विसापूर मधील नायरा कंपनी व गणराज पेट्रोल पंप यांच्यावतीने रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळून शिबिरामध्ये 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी तरुणांसोबत महिलांनीहि रक्तदान केले.
कोणाचा वाढदिवस नाही,जयंती नाही, पुण्यतिथी नाही की कसला कार्यक्रम नाही.राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने पंप मालक सुशांत शिंदे त्यांचे सर्व मित्रमंडळी,विसापूर सरपंच अशोक मोहिते यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.