प्रतिष्ठा न्यूज

टेंभू’च्या पाण्याने सिद्धेवाडी तलाव भरून घेणार रोहित पाटील; वायफळे येथील बंधाऱ्याची पाहणी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी हा तलाव टेंभूच्या पाण्याने भरून घेणार आहे.संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी तसे बोलणे झाले आहे, असे आश्वासन राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी दिले.
वायफळे येथील अग्रणी नदीवरील टेंभूच्या पाण्याने भरलेल्या बंधाऱ्याची पाटील यांनी पाहणी केली.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
तासगाव तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान ठरणाऱ्या सिद्धेवाडी तलावातील पाणी पातळी कमालीची कमी झाली आहे.या तलावातून सावळज भागात पाणी सोडल्याने तलाव झपाट्याने मोकळा होत आहे. शिवाय वायफळे परिसरातून वाहणारी अग्रणी नदीही कोरडी पडली आहे. त्यामुळे एप्रिल छाटणीनंतर अनेक शेतकऱ्यांना पाणीप्रश्न भेडसावत होता.टेंभूच्या भुड येथील पाचव्या टप्प्यातून अग्रणी नदीत पाणी सोडले जाते.अग्रणी नदीतून सायफन पध्द्तीने हे पाणी सिद्धेवाडी तलावात जाते.मात्र महिनाभरापासून भुड येथून अग्रणी नदीत सोडलेले हे पाणी करंजे (ता. खानापूर) हद्दीत आले की बंद केले जायचे.त्यामुळे वायफळे परिसरातील शेतकरी या पाण्यापासून वंचित  रहायचे.याबाबत वायफळे येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्याशी संपर्क साधून टेंभूचे पाणी सिद्धेवाडी तलावापर्यंत सोडण्याची विनंती केली होती.त्यानंतर रोहित पाटील यांनी वारणाली येथील संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.टेंभूचे पाणी नियमित सुरू ठेवून सिद्धेवाडी तलावापर्यंत सोडावे या पाण्याने तलाव भरून घ्यावा,अशी विनंती केली.त्यानुसार गेल्या चार दिवसांपासून टेंभूचे पाणी वायफळे हद्दीत दाखल झाले आहे.उद्यापर्यंत हे पाणी सिद्धेवाडी तलावात पोहोचेल. या पार्श्वभूमीवर रोहित पाटील यांनी आज वायफळे येथील टेंभूच्या पाण्याने भरलेल्या बंधाऱ्याची पाहणी केली.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.तर या पाण्यावर तलाव भरून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसे बोलणे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी झाले आहे असे पाटील यांनी यावेळी सांगितले.यावेळी वायफळेचे सरपंच संतोष नलवडे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील,शिवाजी पाटील,शिवाजी विकास सोसायटीचे चेअरमन विनोद पाटील,आर. जे. पाटील,ग्रामपंचायत सदस्य अंकुश फाळके,स्वप्नील पाटील,मोहन पाटील,उमेश पाटील उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.