प्रतिष्ठा न्यूज

गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडीकल कॉलेजचा विदयार्थी कु.अभिजीत साहेबराव डुबल याला विद्यापीठाचे गोल्ड मेडल

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : मिरजेतील गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडीकल कॉलेज मधील तृतीय वर्ष बी.एच.एम.एस. चा विद्यार्थी कु. अभिजीत साहेबराव डुबल याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक च्या उन्हाळी 2022 च्या तृतीय वर्षाच्या परीक्षेमध्ये ऑरगॅनॉन विषयामध्ये 200 पैकी 178 गुण प्राप्त करुन विद्यापीठाकडून गोल्ड मेडल मिळविले. त्याच्या या यशानिमित्त संस्थेचे संस्थापक-चेअरमन पृथ्वीराज पाटील यांचे हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्याचे कौतुक करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

कु. अभिजीत साहेबराव डुबल याला प्राचार्य, डॉ राजेंद्र मेथे व ऑरगॅनॉन विषयाचे विभाग प्रमुख डॉ. सुहास पाटील व इतर शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र मेथे म्हणाले, त्यांनी केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे हे उज्वल यश तो संपादन करू शकला. त्याला पुढील उज्वल यशास शुभेच्छा.

यावेळी कॅम्पस कोऑर्डीनेटर श्री. सतिश पाटील, उपप्राचार्य, डॉ. सुहास पाटील, डॉ. शितल पाटील, डॉ प्रताप भोसले, निर्वाणे मॅडम, मिलींद कुलकणी, पालक साहेबराव डुबल उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.