प्रतिष्ठा न्यूज

वाटेगांव हायस्कूलमध्ये सन १९७२ च्या एस. एस. सी. विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्युज/ योगेश रोकडे
सांगली : येथील वाटेगांव हायस्कूलमध्ये सन १९७२ मध्ये  शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. एकमेकांचे चेहरे ओळखले नाही असा अमुलाग्र बदल प्रत्येकात पाहायला मिळाला.  शाळा म्हंटले की, मित्र-मैत्रिणी, गप्पा-गोष्टी, मज्जा-मस्ती, आनंद असे वातावरण असते. असाच अनुभव वाटेगांव येथे आला. १९७२ सालीच्या जुन्या एस.एस.सीचे सर्व विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी स्नेह मेळावा कार्यक्रमाचे आयोजन केले.जुन्या बऱ्याच सवंगड्यांना व गुरुवर्यांना देवाज्ञा झाली होती, त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली  वाहण्यात आली. दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने जीवनातील चांगल्या वाईट अनुभवाबरोबरच शालेय जीवनातील अनेक गमतीशीर किस्से सांगितले. प्रत्येकाच्या अनुभवातून गुरुचे असणारे महत्त्व विशद करण्यात आले. आज आम्ही जे प्रतिष्ठित जीवन अनुभवत आहे, हे आमच्या गुरूंमुळेच, त्यांनी दिलेल्या अनुभवाच्या शिदोरीमुळे आम्ही सुखकर जीवन जगत असल्याचेही सांगण्यात आले.
         या अतिशय गोड व भावनिक स्नेह मेळाव्याचे  सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश करांडे यांनी केले. उपस्थित गुरुवर्यांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. १९७२ सलाचे व कार्यरत गुरुवर्यांचा सन्मान या माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचारी निवृत्ती साठे यांचाही सन्मान  करण्यात आला. एस.एल.माने, सी.के.दरेकर, सुभाष बर्डे असे गुरुवर्य कार्यक्रमास उपस्थित होते.सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यामध्ये समाजहिताचा वसा स्वीकारला. यावेळी १९७२ सालच्या वर्गातील विद्याथी-विद्यार्थींनी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.