प्रतिष्ठा न्यूज

तासगाव श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या युद्धकला शिबिराचा समारोप रायगड दर्शनाने

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आयोजित शिवकालीन युद्धकला शिबिर अंतर्गत रायगड दर्शन घेऊन शिवकालीन युद्धकला शिबिराचा सांगता समारोप अतिशय उत्साहात पार पडला.शिवतीर्थ तासगांव येथे ऍड श्री.तुकाराम कुंभार,भाजपा युवानेते संदीप सावंत यांच्या शुभहस्ते शिवतीर्थला नारळ वाढवून रायगड कड़े प्रस्थान करण्यात आले.गड देवता आई शिरकाई देवीचे दर्शन घेऊन गड दर्शनाला सुरवात करून गड़ावरती विद्यार्थ्यांनी राजसदरेवर शिवरायांना मानवंदना देऊन पुढे होळीच्या माळावर प्रात्यक्षिक करून छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली.तसेच श्री जगदीश्वराचे आशिर्वाद घेऊन छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे सर्व विद्यार्थ्यांनी नतमस्तक होऊन शिबिराचा समारोप केला.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मराठ्यांचा इतिहास व रायगडाची माहिती देण्यात आली.यावेळी तासगांव प्रमुख शुभम माने,अक्षय गायकवाड़,किरण जाधव, अनिरुद्ध पाटिल,मयुर माळी,नितिन सोनंदकर व पालक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.