प्रतिष्ठा न्यूज

हिंदू आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला; लव्ह इन रिलेशन नावाखाली महिलांचा छळ करणा-यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी

प्रतिष्ठा न्युज/ जिल्हा प्रतिनिधी

नांदेड दि.2 : सक्तीचे धर्मांतर आणि पैशाचे प्रलोभन दाखवून हिंदू धर्मातील महिलांचा होणा-या छळाच्या विरोधात हिंदू समाजातील लोकांचे मन संतापले आहे.
लव इन जिहाद आणि लव
इन रिलेशन यांच्या नावाखाली महिलांचा छळ करणे निर्घृण हत्या करणे या प्रकाराला आळा घालावा, या प्रकारातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी नांदेड येथे हिंदू आक्रोश मोर्चा च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. जुन्या शहरातील सराफा बाजारांमधील कै.भोजालाल गवळी चौकात मंगळवारी हजारो कार्यकर्ते गोळा झाले. यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटना, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी ,विविध संघटना संस्थांची प्रतिनिधी प्रातिनिधिक स्वरूपात मार्गदर्शन केले.
त्यानंतर आक्रोश मोर्चा निघाला. बर्की चौक, जुना मोंढा ,गुरुद्वारा चौक, महावीर चौक, मूथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कचेरीवर धडकला .
ज्ञया मोर्चात महिला तरुण तरुणींचा युवकांचा मोठ्या प्रमाणात लक्ष्मी सहभाग होता.
गेल्या काही वर्षापासून हिंदू तरुणींना फूस लावून, तिचे नाव बदलून, लग्न करून, धमकी देणे, छळ करून, तिचे सक्तीचे धर्मांतर करून व नंतर तिची हत्या करण्याचे षडयंत्र देशभर रचले जात आहेत.
तसेच हिंदू समाजाच्या दुर्बल घटकांना आमिष दाखवून खोटे बोलून फसवणूक अंधश्रद्धेला बळी पाडून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न जोमाने सुरू आहे ही समाजासाठी अत्यंत चिंताजनक बाब बनली आहे.
दिल्लीची घटना ताजी असतानाच मुंबईच्या श्रद्धा वालकर हीची निर्घृण हत्या करून तिच्या देहाचे अनेक तुकडे करण्यात आले .तसेच नांदेडच्या स्वप्निल नागेश्वर या तरुणाची प्रेमप्रकरणातून धर्मांध घटाने अमानुष हत्या केली. या घटनांची सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहेत.
माणुसकीला काळीमा फासणा-या अशा प्रकरणात गुन्हेगारांना त्वरित अटक करून कायद्याद्वारे त्यांनी केलेल्या गुन्ह्यात त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी संतप्त भावना हिंदू आक्रोश मोर्चा द्वारे व्यक्त करण्यात आली.
या प्रकरणाकडे विशेष लक्ष देऊन धर्मांतर बंदी कायदा ,लव जिहाद,लव इन रिलेशन संबंधित कायदा लागू करावा. असे खटले विशेष जलद कृती न्यायालयात चालवण्यात यावीत .गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशा मागण्या करणारे लेखी निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
या निवेदनाच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकारचे गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आल्या आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.