प्रतिष्ठा न्यूज

पंढरपूर सिंहगड मध्ये “पायथॉन प्रोग्रामिंग” या विषयावर व्हॅल्यू अँडेड प्रोग्रॅम” संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : एस. के. एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग व इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर्स (आई.ई.टी.ई) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ ते १ डिसेंबर२०२२ या कालावधीत “पायथॉन प्रोग्रामिंग“ या विषयावर व्हॅल्यू ॲडेड प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या झेन्सार या नामांकित कंपनीत कार्यरत असणारे रोहित अग्रवाल यांनी सध्याच्या युगात पायथॉन चे महत्व, पायथॉन हे सॉफ्टवेअर कसे डाउनलोड करायचे, पायथॉनचे कार्य ,पायथॉनचे महत्व, पायथॉन मध्ये प्रोग्रामिंग कसे करायचे याविषयी प्रत्यक्ष प्रात्याक्षिक करून दाखवून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात बोलताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे म्हणाले, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त परंतु विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व नोकरीत संधी मिळण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग म्हणून पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज महाविद्यालयात असे विविध कार्यक्रम नेहमीच आयोजित करत असते याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाअंतर्गत तृतीय वर्षात शिकणाऱ्या ७० हुन अधिक विद्यार्थ्यानी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी , प्रा. वैभव गोडसे, विद्यार्थी प्रतिनिधी रोहन चौगुले, विनायक ऐवळे यांनी परीश्रम घेतले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.