प्रतिष्ठा न्यूज

सुंदर नगर वारंगना वस्तीमध्ये जागतिक एड्स दिनानिमित्त कॅन्डल मार्च

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीतील सुंदर नगर वारंगाना वस्तीमध्ये आज जागतिक एड्स दिनानिमित्त कॅन्डल मार्च करण्यात आला. सांगलीच्या सुंदर नगर मध्ये सांगली सिव्हिल हॉस्पिटल आणि वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमान हा कॅन्डल मार्च संपन्न झाला. प्रति वर्षाप्रमाणे जागतिक एड्स दिली सुंदर नगर वेश्या वस्तीमध्ये हा कॅन्डल मार्च काढला जातो. आज स्थानिक नगरसेविका अनारकली कुरणे आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण आणि सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे अधिकारी एड्स नियंत्रण कार्यालयाचे प्रमोद संकपाळ, समुपदेशक प्रेमा संकपाळ, लेखापाल निलोफर मुल्ला, समूपदेशक दीपक मुळे, आसिफ मुल्ला आदीच्या उपस्थितीमध्ये सुंदर नगर मध्ये कॅन्डल मार्च संपन्न झाला. या कॅण्डल मार्चमध्ये सुंदर नगर मधील सर्व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. एड्स हटाव देश बचाव अशा घोषणा यावेळी सुंदर नगर मध्ये देण्यात आल्या. सर्वच महिलांनी एड्स बाधित रुग्णाशी सौजन्य वागा रुग्णांना दुजा भावाची वागणूक देऊ नका. अशा स्वरूपाचे अपेक्षा यावेळी व्यक्त केली. सांगली सिव्हिल हॉस्पिटल करून या संपूर्ण कार्यक्रमाचे कौतुक हे या ठिकाणी करण्यात आलं. यानंतर एड्स बोधचिन्ह असणाऱ्या चिन्हावर सर्वांनी मेणबत्ती प्रज्वलित करून आपला जागतिक एड्स दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.