प्रतिष्ठा न्यूज

डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन तासगाव मध्ये वेगवेगळ्या उपक्रमांनी संपन्न…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या अकराव्या स्मृती दिनानिमित्त तासगाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या व समविचारी पक्ष संघटना यांच्या वतीने दिवसभरात वेगवेगळे उपक्रम  करण्यात आले.डाॅ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर त्यांच्या खुनाच्या खटल्यातील मुख्य सुत्रधार अजुनही मोकाट फिरत आहे.ज्या तरुण मुलांना दाभोलकर कोण होते हे नीटसे माहीत नव्हते अश्या मुलांना गुन्हेगारी कृत्य करायला लावणारे मुख्य सुत्रधार पकडले जावेत यासाठी प्रतिकात्मक निषेध व्यक्त करण्यासाठी अंनिसचे कार्यकर्ते सकाळी फिरायला गेल्यानंतर डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला,”तुम्ही माणूस मारु शकता, विचार मारु शकत नाही”हा संदेश देत निर्भयपणे सकाळी फिरायला बाहेर पडत तुम्ही शरीराने दाभोलकर मारले तर आम्ही विचाराने दाभोलकरांचे विचार पेरत राहू हा संदेश देत तासगावचे कार्यकर्ते सलग अकरा वर्षं अहिंसात्मक मार्गाने आंदोलन करत आहेत.यावर्षी सुध्दा हे आंदोलन करण्यात आले.२०ऑगस्ट हा वैज्ञानिक दृष्टिकोन दीन म्हणून साजरा करण्यात येतो.महाविद्यालयीन मुलांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी पद्मभूषण डॉ वसंतदादा पाटील महाविद्यालय आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “वैज्ञानिक दृष्टिकोन”या विषयावर व्रिकांत पाटील यांच्या व्याख्यानाचे नियोजन करण्यात आले.तरुणांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारावा असे मत त्यांनी व्यक्त केले श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या अर्थसचिव पदी निवड झालेल्या प्रा मिलिंद हुजरे सर यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली.डाॅ दाभोलकर विचार घरोघरी या अभियाना अंतर्गत  १५ पुस्तिका माफक दरात उपलब्ध करून देताना,पुस्तकाच्या संचाचे प्रकाशन प्रा मिलिंद हुजरे सर यांच्या हस्ते करण्यात आले.या पुस्तकांची ओळख अंनिसच्या राज्य कार्यकारिणी सदस्य सुजाता म्हेत्रे यांनी करुन दिली.रोज नवं नवीन डे साजरे होत असताना,वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस मुलांना कळायला हवा म्हणून या दिवशी आपल्या महाविद्यालयात अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या क्रार्यक्रमाचे आयोजन केल्याचे मत अमर खोत यांनी मांडले.डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर जादुटोणा आणि नरबळी विरोधी कायदा २०१३साली संमत करण्यात आला त्या कायद्याच्या अंमलबजावणी साठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात यावे या मागणीसाठी तासगाव अनिस कडून मा पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले,यावेळी या कायद्याची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम,२०१३ कायद्याच्या अनुसुची आणि अंमलबजावणी यासाठी पोलीस प्रशिक्षण गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.यावर मा  पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी लवकरच या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यास‌ सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध उपक्रमात प्रा डॉ बाबुराव गुरव, प्रा वासुदेव गुरव,भाई दिगंबर कांबळे, भाई अर्जुन थोरात,भाई पांडुरंग जाधव,भाई समीर कोळी,माजी अध्यक्ष सरपंच परिषद प्रदीप माने,   मा.दत्तात्रय बामणे,डॉ सतिश पवार, विशाल खाडे सर,माने सर,नुतन परिट, बागवडे मॅडम,ऋतुजा खोत, दत्तात्रय सपकाळ,अमर खोत व महाविद्यालयातील शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.