प्रतिष्ठा न्यूज

आनंदी शिक्षण संस्थेस बीएसस्सी नर्सिंगची चालू शैक्षणिक वर्षापासून मान्यता ; नर्सिंग कोर्स ला प्रवेश घेण्याचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ,कळंबे या संस्थेला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (महाराष्ट्र शासन) यांची सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून मान्यता देण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्र सचिव डॉ. विद्या देसाई यांना संस्थेचे अध्यक्ष सतिश देसाई यांचेकडे सुपुर्त केले आहे.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना देसाई म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहीजे, त्यांना शासकीय किंवा अन्य विभागत नोकरी मिळाली पाहीजे या उद्‌देशाने सदर बी.एस्सी. नर्सिंग कोर्स सुरु केला” तसेच बरेच दिवसापासून विद्यार्थी व पालक वर्गातून वारंवार मागणी केली जात होती.त्याची पूर्तता केल्या बद्दल संस्थापक अध्यक्ष सतिश देसाई व सचिव डॉ. विद्या देसाई यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.
परिसरातील सर्व विद्यार्थीनीनी बी.एस्सी नर्सिंग कोर्स ला प्रवेश घेण्याचे आवाहन यावेळी अध्यक्ष यांनी केले. या प्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ. विद्या देसाई,, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.टी.एम.पाटील डॉ. एस.एस. पानारी, प्रा. आदिनाथ कांबळे, प्राचार्य डॉ. सुरेश किल्लेदार, डॉ. आर.एस. आडनाईक सर्व कर्मचारी व विद्यार्थी पालक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.