प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्हा पोलीस भरती पात्र उमेदवारांची यादी जाहीर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षा व कौशल्य चाचणीकरीता पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई पदांकरीता २७ रिक्त पदे, चालक पोलीस शिपाई पदांकरीता १३ रिक्त पदे अशा एकुण ४० रिक्त पदांकरीता भरती प्रक्रिया चालु असुन शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी पात्र झालेल्या पोलीस शिपाई पदासाठी १:१० प्रमाणे लेखी परीक्षेसाठी व पोलीस शिपाई चालक पदासाठी कौशल्य चाचणीकरीता पात्र असलेल्या १:१५ प्रमाणे उमेदवारांचे गुणपत्रक यादी सांगली जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिध्दी माध्यम sp.sangli@mahapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी सदरची माहिती पोलीस अधीक्षक, सांगली यांचे कार्यालयाबाहेर व पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, सांगली या ठिकाणी लावण्यात आलेली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.