प्रतिष्ठा न्यूज

स्वराज्य फौंडेशनच्या माने भगिनींनी गौरवशाली इतिहास घडविला : रोहितदादा पाटील

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव/प्रतिनिधी : तासगाव तालूक्यास क्रीडा पंढरी म्हणून नावलौकीक मिळाली. या भूमीतील अनेक खेळाडुंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवले मात्र, ही यशाची परंपरा काही कारणांनी खंडीत झाली होती. त्या परंपरेला आपल्या क्रीडा कौशल्याची किनार लावून स्वराज्य फौंडेशनच्या खेळाडुंनी पाटणा येथे झालेल्या नॅशनल इंटर डिस्ट्रिक्ट स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आणि ते ही किरण माने यांच्या कुटुंबातील दोन बहिणींनी ही अभिमानाची बाब आहे. या मुलींचा सत्कार माझ्या हातून होताना मी एकच म्हणेन तुम्ही हाती घेतलेला गौरव कलश महाराष्ट्र आणि देशात तासगावचे नाव पुन्हा एकदा उज्वल करु असे प्रतिपादन युवानेते
रोहीतदादा यांनी केले.

ज्युनियर अॅथलेटिक्स मीट या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये देशभरातून ९४८ मुलींनी सहभाग नोंदविला होता त्यामध्ये ट्रायथलॉन ‘बी’ या गटात कु. वर्षा किरण माने ही देशात २२ वी तर, महाराष्ट्रात तृतीय आली.

तसेच ट्रायथलॉन ‘सी’ या गटात कु. वैष्णवी अमोल माने हिने संपूर्ण देशात ४४ वा तर, महाराष्ट्रात चौथा क्रमांक मिळवाला प्रशिक्षक अंकुश कलगुटी यांचाही सत्कार रोहीत दादांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी, स्वराज्य फाउंडेशन सर्व खेळाडू व उपाध्यक्ष कृष्णा माळी , अभिजित पवार यांनी दिलेले प्रोत्साहन म्हणजे यश असे रोहितदादांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या यशावर बोलतांना स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष किरण माने म्हणाले, ‘आज या मुलींचा सत्कार होत असताना मला अत्यानंद होत आहे. माझ्या कुटुंबातील दोन कन्यांनी मिळवलेले राष्ट्रीय पातळीवरील यश म्हणजे तासगावच्या क्रीडा क्षेत्राची यशगिरी होय, भविष्यात खेळाडूंच्या साठी अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

यावेळी, प्राध्यापक जी के पाटील, राष्ट्रवादी तासगाव शहराध्यक्ष ॲड गजानन खुजट अभिजीत कोळेकर, पवन माने, स्वप्नील पाटील, मेट्रो फायनान्सचे प्रो.प्रा. अभिजीत माने पत्रकार दिलीप जाधव, हर्ष घाडगे अमोल माने आदी सर्व उपस्थितांचे आभार केसरीचे पत्रकार अजित माने यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.