प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा – खारेपाटण मार्गावर डंपर बंद पडल्याने तब्ब्ल १० तास वाहतूक ठप्प

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ

गनबावडा, ता.२९ : भुईबावडा घाटातून कोल्हापूरकडे जाणारा डंपर गगनबावड्यापासून ४ कि.मी.अंतरावर रस्त्याच्या मधोमध बंद पडला. त्यामुळे घाटातील वाहातूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

गगनबावडा – खारेपाटण मार्गावरील वाहातूक तब्ब्ल १० तास ठप्प झाली होती. घाटात दोन्हीही बाजूला अनेक वाहने अडकून पडली होती. ही घटना शनिवारी घडली. जेसीबीच्या सहाय्याने दरडीकडचा भाग तोडून दुपारी वाहातूक सुरु करण्यात आली आहे.

भुईबावडा घाटातून कोल्हापूरकडे जाणारा डंपर गगनबावड्यापासून ४ कि.मी.अंतरावर रस्त्याच्या मधोमध बंद पडला. त्यामुळे घाटातील वाहातूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहानांच्या रांगा लागल्या होत्या. यामध्ये गगनबावडा साखर कारखान्याकडे जाणारे ऊसाचे ट्रक अडकून पडले होते. याबाबत वैभववाडी पोलिसांना माहीती मिळताच वाहातूक पोलिस विलास राठोड, तांबे हे घटनास्थळी पोहचले. डंपरचे इंजिन लाॕक झाल्यामुळे डंपर जागेवरुन हालत नव्हता. अखेर जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याच्या डगरीकडच्या बाजूला खणून वाहनांना जाण्यासाठी मार्ग तयार करुन दुपारी वाहातूक सुरु करण्यात आली आहे.

 

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.